BJP MLA : भाजप आमदाराला ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

BJP MLA Mahesh Baldi : भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी यांना २०१० मधील मारहाण प्रकरणात अलिबाग न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, न्यायालयाने चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
BJP MLA Mahesh Baldi
BJP MLA Mahesh Baldi
Published On: 

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

BJP MLA Mahesh Baldi sentenced to three years in jail : भाजपचे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांना अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी (CJM) न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१० मधील एका मारहाण प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला. महेश बालदी यांच्यासह एकूण ४ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

हे प्रकरण २०१० सालचे आहे. उरण परिसरातील एका मुलीची छेडछाड झाली होती. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी आणि त्यांचे काही सहकारी संबंधित तरुणाकडे गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून संबंधित तरुणाला गंभीर दुखापत व शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अलिबाग न्यायालयात खटला सुरू होता.

BJP MLA Mahesh Baldi
दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार नाही; 'चैत्यभूमी' नाव 'या' स्थानकाला देणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

चारही आरोपींना जामीन मंजूर

अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी या खटल्यावर आज अंतिम निकाल सुनावत आमदार महेश बालदी यांच्यासह चारही आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर या चारही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, जिल्हा न्यायालयात या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

BJP MLA Mahesh Baldi
माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या आमदाराचं निधन; राजकारणात हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.