Beed Unseasonal Rain
Beed Unseasonal RainSaam Tv

Beed Unseasonal Rain : केज तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून शाळकरी मुलगा ठार; एक जखमी

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on

Beed Unseasonal Rain News Update : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या युसुफ वडगावमध्ये वीज पडून शाळकरी मुलगा ठार झाला असून अन्य एक जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

Beed Unseasonal Rain
Gautami Patil Program News: महिलांच्या हाती काठ्या अन् दांडकी... असं काय घडलं गौतमीच्या कार्यक्रमात

ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी उशिराच्या दरम्यान घडली आहे. संकेत गित्ते रा. धोतरा असं विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. तर सुशांत वाकळे रा. केज असं जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. जखमी मुलावर अंबाजोगाईच्या (Ambajogai) स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांच्या (Farmer) डोळ्यांसमोर शेतीचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यामुळेही नुकसान झाले. पिके वाहून गेली. 

Beed Unseasonal Rain
Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray: राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली शक्यता

काल सायंकाळनंतर आभाळ भरून आले आणि वीजेचा कडकडाट सुरू झाला. यामुळं जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान यामुळं पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com