माधव सावरगावे
औरंगाबाद : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने त्यांच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या राजकीय घडमाडीवर भाजप नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Rajya sabha election)
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ' ज्या दिवसापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले, तेव्हापासून लोक उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत आहे. त्यांनी राज्याला कुठ नेऊन ठेवला ? असा प्रश्न विचारत आहे. अडीच वर्षात ते एकदाच मंत्रालयात गेले. त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली किती. आमच्या योजना बंद केल्या किती. तुमच्या किती योजनांची अंमलबजावणी केली आहे. हे लोक विचारत आहे'.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमदरांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरूनही टीका केली आहे. 'महाविकास आघाडीसोबत सत्तेत असलेल्या अपक्ष आमदारांवर सुद्धा इतका अविश्वास का दाखवला?, त्यांना हॉटेलमध्ये बंदिस्त का ठेवावं लागलं. हॉटेलमध्ये आमदारांना बंदिस्त करून ठेवत असेल तर यांचा लोकशाही विश्वास नाही असं दिसतं आहे. आमदार फुटू नये म्हणून एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवावे लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजराच्या पिल्लासारखी झाली आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.