मुंबई: राज्यात काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण घटले होते, आता कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. आज राज्यात १८८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील आजची आकडेवारी ही सर्वात जास्त आहे. काल १ हजार ८० रुग्ण नोंदवले होते. आज रुग्णांत दुप्पट वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आज ८७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात ८,४३२ रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. राज्यातील कोरोना (Corona)रुग्णांची एकूण संख्या ७७,३९,८१६ झाली आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढे आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ९८.०३% एवढे आहे.
मुंबईत कोरोनाची (corona) तिसरी लाट ओसरली असताना, आता आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने चौथ्या लाटेची धास्ती वाढवली आहे. आज मुंबईत कोरोना रुग्णांत दुप्पट वाढ झाली आहे. मुंबईत १२४२ रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज एकाच दिवसात १८८१ रुग्ण आढळले आहेत.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्याची रुग्णांची संख्या ७४ आहे, यापैकी १० रुग्ण अतिदक्षता विभागात तर ४ रुग्ण अत्यावस्थ आहेत. आज मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.