शरद पवारांना एनडीएच्या दिग्गज मंत्र्याची खुली ऑफर; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

Sharad Pawar joining NDA latest news : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे खुले आमंत्रण दिले आहे. २०१४ मध्ये एनडीएमध्ये आले असते तर राष्ट्रपती होऊ शकले असते, असा मोठा दावा त्यांनी केला.
Sharad Pawar joining NDA latest news
Sharad Pawar joining NDA latest news
Published On

संजय सूर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

शरद पवार एनडीएमसोबत जाणार असल्याच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एनडीमध्ये आणखी एक मित्रपक्ष वाढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच केंद्री मंत्री रामदास आठवले यांनीही शरद पवार यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. रामदास आठवलेंच्या वक्तव्याने राजकारणात पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांना २०१४ मध्येच एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण त्यावेळी ते आले नाहीत. त्यावेळीच शरद पवार एनडीएमध्ये आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

शरद पवार हे सीनियर नेते आहेत. ते जर २०१४ किंवा २०१९ मध्ये एनडीएमध्ये आले असते, तर त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार होऊ शकला असता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावी असेही मी त्यावेळी त्यांना म्हणालो होतो. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. सोनिया गांधी यांच्याबरोबर संबंध चांगले वाढवले, त्यामुळे कदाचित मनमोहन सिंग दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. त्यावेळी कदाचित पंतप्रधान म्हणून शरद पवारांचाही नंबर लागू शकला असता, असे रामदास आठवले म्हणाले.

शरद पवार एनडीएमध्ये आले असते, मला राष्ट्रपती व्हायचेय, असा प्रस्ताव ठेवला असता तर नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका मान्य केली असती, असे रामदास आठवले म्हणाले. आताही शरद पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर एनडीएत यायला काहीही हरकत नाही. आमचा पक्ष वेगळा आहे. भाजप वेगळी आहे. पण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहोत, असे आठवले म्हणाले.

Sharad Pawar joining NDA latest news
Pune Accident : वारीत पुन्हा भयंकर अपघात, भरधाव कारने वारकऱ्याला चिरडले, जागेवरच मृत्यू

शरद पवारांनी एनडीएमध्ये आता यावं का?

आताही शरद पवारांनी एनडीएमध्ये यायला काही हरकत नाही. त्यांनी जर आज निर्णय घेतला तर त्यांचे आठ खासदार आहेत. त्यांचे आठ खासदार एनडीए सोबत येतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. त्यांचं एनडीएमध्ये आम्ही स्वागतच करू, असे रामदास आठवले म्हणाले.

एनडीएमध्ये शरद पवारांचा काय फायदा?

शरद पवार यांचे सध्या ८ खासदार आहेत, ते आमच्यासोबत येतील. शरद पवार एक सिनिअर नेते आहेत. ते आमच्या सोबत आले तर याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. ते आले तर आमच्या एनडीएचा फायदाच आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

Sharad Pawar joining NDA latest news
Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

भाजप अनेक पक्ष फोडतोय?

स्वतःहून आमच्याकडे खासदार येत आहेत. त्यामुळे आमचे दरवाजे मोकळे आहेत. प्रत्येक खासदाराला वाटतंय की नरेंद्र मोदींसोबत विकासाच्या दिशेने जाणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक पक्षातील खासदार आमच्यासोबत येत आहेत. त्यांना आम्ही फोडलं नाही.पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाल्यानंतर त्यांच्या 80 आमदारांपैकी 58 आमदार दुसऱ्या पक्षासोबत आले आहेत, उरलेले काही आमदार आमच्याकडे येतात का? यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

त्यांचे ८ खासदार आहेत, त्यापैकी चार-पाच खासदार येत असतील तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ममता बॅनर्जी यांचे 20 खासदार त्रिपुराच्या पार्टीमध्ये गेले. पण ते जर आमच्या पक्षात आले असते तर आमचा मोठा फायदा झाला असता, असेही रामदास आठवले म्हणाले.

Sharad Pawar joining NDA latest news
Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात मोठी दुर्घटना, रोहिंग्या निर्वासितांच्या बोटी उलटल्या, ५०० हून अधिक जणांचा मृत्यू

प्रकाश आंबेडकर यांना माझं मंत्रीपद देणार

प्रकाश आंबेडकरांबद्दल मला आदर आहे. प्रकाश आंबेडकर आणि इतर सगळे मोठे छोटे आले तर आमचं बार्गेनिंग पावर वाढणार आहे. १९९० प्रमाणे आम्ही एकत्र राहिलो असतो. तर शरद पवारांनी आम्हाला ३० चाळीस जागा दिल्या असत्या आणि आम्ही मोठा पक्ष म्हणून सत्तेमध्ये राहिलो असतो. त्यावेळी १०-१५ मंत्री आमचे राहिले असते. पण मी एकटाच गेल्यामुळे मला एकट्यालाच मंत्रिपद मिळाला होतं. पुन्हा आम्ही एकत्र आलो तर आरपीआयची ताकद वाढणार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांना रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष करण्याची माझी तयारी आहे. ते बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन हा पक्ष देशपातळीवर कसा वाढेल. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले तर त्यांना मंत्रीपद देऊ आणि मी पण मंत्री राहणारच आहे, असे आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांना सध्या मंत्री होता येणार नाही, तीन वर्ष तर मी राज्यसभेवर आहे, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मंत्री करू, असेही ते म्हणाले.

Sharad Pawar joining NDA latest news
Ladki Bahin Yojana: खात्यात ₹१५०० की ३०००? लाडक्या बहिणींनो, वाचा नेमकी किती महिन्यांची रक्कम जमा झाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com