Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटू लागल्यानंतर अर्ज भरणाऱ्यांची वाढली लगबग; आधार लिंकींगसाठी बँकेत गर्दी

Ulhasnagar News : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली होती
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

उल्हासनगर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी यासाठी अर्ज भरले होते. मात्र पैसे मिळतील कि नाही या शंकेने अनेकांनी अर्ज भरले नव्हते. परंतु सुरवातीला अर्ज भरणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात मागील दोन दिवसांपासून पैसे भरण्यास सुरवात झाली आहे. यामुळे त्यांनी अर्ज भरलेले नाहीत अशा महिलांची आता अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. 

Ladki Bahin Yojana
Dombivali News : गस्त घालणाऱ्या पोलिसांना सापडली पैशांनी भरलेली बॅग; प्रवाशाचा शोध घेत परत केली बॅग

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. याचा पहिलाहप्ता रक्षाबंधांपासून सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. (Ulhasnagar) त्यानुसार योजनेची घोषणा झाल्यानंतर लागलीच अनेकांनी अर्ज दाखल केले. मात्र अनेकांना या योजनेचे पैसे भेटणार नाही अशी शंका असल्याने अर्ज भरले नाही.  

Ladki Bahin Yojana
Pimpri Chinchwad : मद्यधुंद अवस्थेत गाड्यांची तोडफोड; नागरिकांवरही भिरकावले दगड, पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान आता महिलांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरवात झाली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे काही भेटणार नाही, असा समज असणाऱ्या महिला आता जाग्या झाल्या आहेत. काही महिला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहेत. तर काही महिला आधार कार्ड बँकेची लिंक करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत, 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com