अभिजित देशमुख
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्याची पैशांनी भरलेली बॅग परत मिळाली. या बॅगमध्ये १ लाख ६२ हजार रुपये रोख रक्कम होती. डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाला गस्त घालत असताना ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर लोकलच्या डब्यात ही बेवारस बॅग आढळली. पथकाने तपास करून बॅग संबंधित प्रवाशाला परत केली. पैशांनी भरलेली बॅग परत मिळाल्यामुळे प्रवाशाने डोंबिवली रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
डोंबिवली रेल्वे पोलिस (Railway Police) स्टेशनचे पोलीस कर्मचारी चौधरी, बांबले, बोईनवाड आणि जाधव हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होते. या वेळी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण स्लो लोकलच्या जनरल डब्यात एक काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळली. या पथकाने ती बॅग ताब्यात घेऊन (Dombivali News) डोंबिवली पोलिस ठाण्यात आणली. तपासणी दरम्यान बॅगमध्ये १ लाख ६२ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली.
त्या प्रवाशाचा शोध घेत बॅग केली परत
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चौकशीअंती बॅग डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी जयराम शेट्टी यांची असल्याचे निष्पन्न झाले. शेट्टी हे बॅग लोकलमध्ये विसरले होते. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून शहानिशा केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही बॅग शेट्टी यांच्या स्वाधीन केली. शेट्टी यांनी लोहमार्ग पोलिसांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून, आभार व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.