Shivsena-VBA Alliance
Shivsena-VBA AllianceSaam TV

Shivsena-VBA Alliance : हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना आव्हान

शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा
Published on

Shivsena-VBA Alliance : गेल्या दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे.

Shivsena-VBA Alliance
Shivsena-VBA Alliance: आमचं फार जुनं भांडण आहे...; युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांकडे व्यक्त केली ही अपेक्षा

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी येथे आम्ही एकत्र येत आहोत. राजकारण जे चाललं आहे त्यावर आघात करून मोडून तोडून टाकण्यासाठी जे जीवाला जीव देणारे सहकारी आहेत ते एकत्र आले आहेत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं.

"पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊ. आपले पंतप्रधान मुंबईत येऊन गेले लोक कुठून आले कुठून आणले हे सर्वाना माहिती आहे. आम्हाला जेव्हा वाटलं की आपल्यासोबत फसवणुकीचा राजकारण होतंय तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत गेलो आणि मविआ सरकार स्थापन केले.

Shivsena-VBA Alliance
Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या पदांवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन

आमचे संबंध कसे होते हे जग जाहिर आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष कसे येतील असं सर्वांना वाटतं होत. पण आम्ही हे सरकार व्यवस्थित चालवलं. काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं आणि एकत्र येऊया असं नाही. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली आणि आमचं असं ठरलं की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या मित्रपक्षाला आणायचं आणि मित्रपक्षांसोबत हित सांभाळायचं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अजून कोणी कुठल्या जागा लढवायच्या ही वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल, तसंच हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना दिलं आहे.

मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com