Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Meets Abhijit Deepke at Jantar Mantar : उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतरला भेट दिली, अभिजीत दीपके यांची भेट घेतली आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला.
Uddhav Meets Abhijit Deepke at Jantar Mantar
Uddhav Meets Abhijit Deepke at Jantar Mantar
Published On

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी नाही तर गुंडांनी लाठीचार्ज केला. सरकारनं विद्यार्थ्यांच्या भविष्यावर हल्ला केलाय. तरुण हे देशाचे भविष्य आहेत, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशाच्या राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले. दिल्लीत पोहोताच उद्धव ठाकरेंनी जंतर मंतर गाठत अभिजीत दीपके यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या मनी नवी चेतना भरत उद्धव ठाकरेंनी लढा मजूबत करण्याचा सल्ला दिला.

Uddhav Meets Abhijit Deepke at Jantar Mantar
राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

काही गुंड तुमच्यावर काठ्यांनी हल्ले करत होते; त्यातीलच एका गुंडाचा 'वॉन्टेड' म्हणून उल्लेख असलेला फोटो सध्या व्हायरल होतोय. हे लोक शेवटी जाणार तरी कुठे? आज कदाचित ते सत्तेच्या खुर्चीवर असतील, पण उद्या तुमच्यापैकीच कोणीतरी नाही तर तुमच्यापैकी अनेकजण त्याच खुर्चीवर विराजमान व्हाल. त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल जाब द्यावाच लागेल.

याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. कदाचित त्यांना याची जाणीव नसेल की, भविष्य हे केवळ पुढे सरकणारी गोष्ट नसते. तर ते भविष्य आज माझ्यासमोर प्रत्यक्ष उभे असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी आंदोलनकर्त्यांचा जोश वाढवला.

Uddhav Meets Abhijit Deepke at Jantar Mantar
Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यापर्वी तुमच्या वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं नसतं तर स्वातंत्र्य पाहायला मिळालं नसतं. काही लोक असे होते ज्यांना इंग्रज त्यांना आतंकवादी मानायचे. मला असं वाटतं जे तुम्हाला आतंकवादी म्हणतात ते विदेशातून आलेत की काय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Meets Abhijit Deepke at Jantar Mantar
राहुल- प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; काँग्रेस खासदारांचीही धरपकड

व्यवस्था बदला -उद्धव ठाकरे

आज जे सत्तेत बसलेत त्यांना माहिती नाही की पुढील काळात तुमच्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी बसणार आहेत. या लोकांना कदाचित माहिती नसेल की जे येणारं भविष्य आहे ते माझ्यासमोर उभं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी अभिजीत दिपके यांचे खास आभार मानले. अभिजीत दिपके यांनी एक ठिणगी पेटवलीय. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो येथे लावलेत.

स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळ आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला ३ वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपलं युद्ध सुरू झालंय. फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com