PM Modi ज्याला हात लावतात ते कोसळते, संकेत समजून घ्या; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray on PM Narendra Modi : महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान, शान कोसळून पडली. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता.
PM Narendra Modi News
PM Narendra Modi Saam tv
Published On

Uddhav Thackeray News : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) सोमवारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गेल्यावर्षी या पुतळ्याचे अनावरण केले होते. ८ महिन्यातच पुतळा कोसळल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. सामना वृत्तमानपत्र " महाराज, या चोरांना माफी नाही" या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आलाय. या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलेय. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल, असेही म्हटलेय. काय आहे अग्रलेखात पाहूयात..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका -

मुख्यमंत्री मिंधे हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळय़ास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा!

PM Narendra Modi News
Shivaji Maharaj Statue : दुकानं बंद...शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वातावरण तापलं, 'मालवण बंद'ची हाक

शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता

महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान, शान कोसळून पडली. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता. तो इतक्या घिसाडघाईने उभा करू नका असे बजावण्यात आले होते, तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशेब करून पुतळय़ाचे अनावरण केले गेले. तो पुतळा आज राहिलेला नाही. त्याचे छिन्नविच्छिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले. पंतप्रधानांनी 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळय़ाचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली, पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता व असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती. कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, बेइमानी, व्यभिचारास मुक्त रान आहे व आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात हे जास्त आहे.

PM Narendra Modi News
Shivaji Maharaj Statue : 'शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे'

पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात ते कोसळते

अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला. महाराष्ट्राच्या जनतेने यामागचा अर्थ आणि संकेत समजून घेतले पाहिजेत. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे. त्यांनी उभारलेले एअरपोर्ट, अनेक पूल, अयोध्येतील राममंदिर आणि गळू लागले. सत्तर वर्षांतले हे पहिले पंतप्रधान आहेत, जे आपल्याच कार्यकाळात आपल्याच हाताने बनवलेल्या वास्तू कोसळताना पाहत आहेत. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाच कोसळला.

PM Narendra Modi News
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, जोरदार वारा, समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला. ते खोटे बोलत आहेत. बेफिकिरी, घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारणीचे दिलेले काम व त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला. शिवरायांनी बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग 375 वर्षे भर समुद्रात हाच वादळवारा, लाटा सहन करीत उभा आहे. गिरगावच्या चौपाटीवर समुद्राच्या शेजारी लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली उभा केला. तो ठामपणे उभा आहे. 1957 साली किल्ले प्रतापगडावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी शिवरायांच्या पुतळय़ाचे अनावरण केले तो पुतळाही जसाच्या तसा आहे, पण सिंधुदुर्गातील राजकोटावरील पुतळा आठ महिन्यांत कोसळला. याची जबाबदारी घेऊन सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी.

PM Narendra Modi News
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com