Sanjay Gaikwad : 'मातोश्रीवर शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला', गायकवाड यांचा खळबळजनक आरोप

Sanjay Gaikwad On Cm Eknath Shinde: 'मातोश्रीवर शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला', गायकवाड यांचा खळबळजनक आरोप
Sanjay Gaikwad On Cm Eknath Shinde
Sanjay Gaikwad On Cm Eknath ShindeSaam Tv
Published On: 

Sanjay Gaikwad On Cm Eknath Shinde:

'एकनाथ शिंदे यांना जाणून बुजून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद दिलं गेलं', असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केला.

ते म्हणाले आहेत की, ''नक्षलवाद्यांकडून ज्या वेळी धमक्या आल्या, तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवली जात असताना मातोश्रीहून सुरक्षा न पुरवण्यासाठी फोन आला.'' मातोश्रीहून हा फोन ठाकरेंनीच केल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

Sanjay Gaikwad On Cm Eknath Shinde
Jayant Patil News: 'ज्या शाळेत तुम्ही आता दाखल झाला, त्याचे मुख्यध्यापक शरद पवारांकडून ट्युशन घेतात', पाटलांची अजित पवारांवर टीका

ठाकरे कोणासोबतही घाट करू शकतात: रवी राणा

यावरच बोलताना अपक्ष आमदार रवी राणा म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे हे कोणासोबतही घाट करू शकतात. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार बनवलं.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''स्वतःच्या स्वार्थसाठी मुख्यमंत्री झाले. इतका मोठा घाट ते भाजपसोबत करू शकतात, तर त्यांना एकनाथ शिंदे यांना बळी देण्यासही वेळ लागला नसता.''

Sanjay Gaikwad On Cm Eknath Shinde
Rajasthan Election: राजस्थान निवडणुकीच्या तारखेत बदल, आता 23 नोव्हेंबरला नाही तर 'या' दिवशी होणार मतदान

'संजय गायकवाड यांचे आरोप खोटे'

यातच ठाकरे गटाचे नेते आमशा पाडवी यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मी सुद्धा एक जिल्हा प्रमुख होतो. त्यावेळी आम्ही शिंदे यांच्याकडे जायचो. कारण त्यावेळी सगळ्या जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या माणसाला ठाकरे असं घातपात करतील का, हे सगळे आरोप खोटे आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.