ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; खासदार सावंतांना मातोश्रीवरून आदेश, नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray On Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदार अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलावून महत्त्वाचे निर्देश दिले.
Uddhav Thackeray On Operation Tiger:
Uddhav Thackeray meets MP Arvind Sawant at Matoshree amid ‘Operation Tiger’ political developments.
Published On
Summary
  • ऑपरेशन टायगर’मुळे राजकीय खळबळ

  • उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

  • अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'ऑपरेशन टायगर' राबवत असून त्यांनी ठाकरे गटाच्या काही खासदारांसोबत शिंदे यांनी गुप्त बैठक घेतली. खासदारांच्या बैठकीची बातमी येताच राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचे ठाकरेच्या खासदारांनी स्पष्ट केले. यानंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. खासदार अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतले आणि त्यांना बैठकीत त्यांना काही सूचनादेखील उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत.

Uddhav Thackeray On Operation Tiger:
'शरद पवार धर्म मानत नाहीत', मुख्यमंत्री फडणवीसांची टीका; वारकरी संप्रदायावरील भाष्यामुळे राजकीय वातावरण तापलं!

ठाण्यातील या बैठकीचे वृत्त बाहेर येताच ठाकरे गटाच्या खासदारांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येत सत्यता स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बैठक पार पडली. त्यामध्ये आता ठाकरे गटाकडून हे वृत्त देणाऱ्या संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबत ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ठोस पावले उचलली आहेत. वृत्त देणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यादृष्टीने उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यात चर्चा झाल्याचं सांगतले जात आहे.

Uddhav Thackeray On Operation Tiger:
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची पॉवरफुल खेळी; महाराष्ट्रातील मोठी राजकीय आघाडी फोडली, दिग्गज नेते शिवसेनेत जाणार

दरम्यान शिंदे यांच्या या कथित बैठकीला ठाकरे सेनेचे ६ खासदार प्रत्यक्ष तर दोघे ऑनलाइन उपस्थित होते, असा दावा काही माध्यमांनी केला आहे. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. परंतु शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याचं म्हटलंय. उद्धवसेनेचे खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे यांनीही अशी बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com