'शरद पवार धर्म मानत नाहीत', मुख्यमंत्री फडणवीसांची टीका; वारकरी संप्रदायावरील भाष्यामुळे राजकीय वातावरण तापलं!

Devendra Fadnavis Slams Sharad Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय तापमान तापले आहे.
Devendra Fadnavis Slams Sharad Pawar
CM Devendra Fadnavis and Sharad Pawar at the center of political controversy over Warkari sect remarks.saam tv
Published On
Summary
  • वारकरी संप्रदायावरून राजकीय वाद पेटला

  • शरद पवार यांच्या वक्तव्यावरून टीका

  • मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावरून राजकीय वातावरणात तापलं आहे. सत्ताधारी नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

वारकरी संप्रदायावरील शरद पवार यांचा लेख हा चुकीचा आहे. वारकरी विचारांशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. शरद पवार हे धर्म मानत नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. वारकरी संप्रदाय हा बंधुतेचा विचार आहे. वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मनाची चित्ताची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा पर्यावरणाची साधर्म साधणारा अशा प्रकारचा विचार आहे.

Devendra Fadnavis Slams Sharad Pawar
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, शरद पवारांना दिला धक्का; ३ दिग्गज नेते 'धनुष्यबाण' घेणार हाती

यामुळे शरद पवार साहेबांचा जो काही लेख आहे, तो चुकीचा आहे. पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला,याचा आपल्याला दु: ख असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. वारकरी विचाराच्या विरोधात जाऊन जे लोकं वारकरी संप्रदायामध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांची यादी आपण शरद पवार यांना पाठवू असंही फडणवीस म्हणाले. ज्यांना वारकरी परंपरेने झिडकारलं त्या लोकांचा संबंध हा अर्बन नक्षल चळवळीशी आहे. त्या संदर्भातला डोझियर देखील माझ्याकडे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis Slams Sharad Pawar
By-Election: बारामती पोटनिवडणुकीतील सस्पेन्स संपला; काँग्रेसच्या माघारीनंतर सुनेत्रा पवारांची आता अपक्षांशी लढत

वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे", असे विधान शरद पवार यांनी केले होते. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेतील मुलाखतीत शरद पवारांनी वारकरी संप्रदायाबद्दल भाष्य केले आहे. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com