यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईची सत्ता काढून घेत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईमध्ये भाजपला 89 आणि शिंदेगटाला 29 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुना 71 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 12 आहे. यंदा पहिल्यांदाच भाजपने मुंबई महापालिका काबीज केली आहे. या सगळ्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले मी सर्व मतदार आणि दोन्ही पक्षांचे आभार मानतो. पुढे ते म्हणाले, भाजपने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमीनिवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातील इतर निकालांनी दाखवून दिले आहे. भाजप हा कागदावरती आहे. पण जमिनीवर नाही. तो जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते.
सत्ताधाऱ्यांनी साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा वापर करत आमच्या उमेदवारांना तडीपार केले, पैशांचे वाटप केले, असा उद्धव ठाकरे गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबईत महापौर शिवसेनेचाच होणार, अशी आमची इच्छा होती आणि आजही आहे. मात्र अपेक्षित आकडा गाठता आला नाही, असे सांगतानाच, जे काही निकाल लागले ते शिवशक्तीच्या जोरावर लागले असून त्यामुळे सत्ताधारी पक्षाला घाम फुटला असल्याचे ठाकरे म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी आमचे उमेदवार संपवण्यासाठी एकही प्रयत्न शिल्लक ठेवला नाही, असा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभेतील सभेचा उल्लेख केला.
त्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या, तरीही मतदान झाले. मात्र रिकाम्या खुर्च्या मतदान कसे करू शकतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. चार वर्षे विकासनिधीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करण्यात आले. साध्या पदाधिकाऱ्यांनाही पैसे देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवर ती संपवू शकत नाही. हे कालच्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. भाजप फक्त कागदावर आहे, जमिनीवर नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.