EVMचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो? महायुतीच्या आमदारानेच व्यक्त केला संशय

Mahayuti MLA Amol Mitkari Questioned EVM Voting: महापालिका निवडणूक निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर महायुतीचे आमदार अमोल मिटकरी यांनीच संशय व्यक्त केला आहे.
Mahayuti MLA Amol Mitkari raises questions over EVMs and demands ballot paper voting after civic poll setback.
Mahayuti MLA Amol Mitkari raises questions over EVMs and demands ballot paper voting after civic poll setback.Saam Tv
Published On

29 महापालिकांचा शुक्रवारी निकाल लागला आणि 25 महापालिकांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. तर पुणे आणि पिंपरीचिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. या ठिकाणी भाजप ही स्वतंत्र निवडणूक लढवत होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप आमदार महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असा संघर्ष होता. मात्र भाजपने मुसंडी मारत राष्ट्रवादीला घरचा रस्ता दाखवला.

Mahayuti MLA Amol Mitkari raises questions over EVMs and demands ballot paper voting after civic poll setback.
Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

तर अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. काही ठिकाणी ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आला. यावरच आता अजित पवार गटाचे आणि महायुतीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील संशय व्यक्त करत निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी केली आहे. काल लागलेल्या महापालिका निवडणूक निकालांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर वगळता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचं मोठं पानीपत झालंय. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी आता मोठी मागणी केलीये. राज्यातील यापुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर'वर घेण्याची मागणी केलीये. सरकार आणि निवडणूक आयोगाला आपल्यावरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं ते म्हणालेत.

Mahayuti MLA Amol Mitkari raises questions over EVMs and demands ballot paper voting after civic poll setback.
पोलिसांना सरकारी घरं, अटल सेतूवर टोल फ्री...महापालिका निवडणूक निकालानंतर फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय

आमदार मिटकरींनी 'बॅलेट'वर मतदान घेण्याची मागणी करत विरोधकांच्या सुरात सुर मिळवलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करूनही आमच्या पक्षाचा पराभव कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केलाय. इव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो? असा सवाल त्यांनी केलाय.

Mahayuti MLA Amol Mitkari raises questions over EVMs and demands ballot paper voting after civic poll setback.
Ladki Bahin Yojana : एकत्र ₹३००० का नाहीत? लाडक्या बहि‍णींचा संताप, थेट महामार्ग रोखला, पाहा व्हिडिओ

दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली बैठक हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणालेत. दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील असं ते म्हणालेत. दरम्यान, कुटुंब म्हणून पवार कुटुंबिय हे कायमच एक असल्याचं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com