Municipal Election results : महापालिका निकालानंतर राडा अन् दगडफेक; भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला मारहाण

Violence after Akola municipal election results : अकोला महापालिकेच्या निकालानंतर अकोट फैल भागात जोरदार राडा आणि दगडफेक झाली. भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
Violence after Akola municipal election results
Violence after Akola municipal election resultsSaam
Published On

अक्षय गवळी अकोला प्रतिनिधी

BJP newly elected corporator Sharad Turkar attacked in Akola : महापालिकेच्या निकालानंतर अकोल्यामध्ये जोरदार राडा झाला. प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या विजयी उमेदवारावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकर यांना बेदम मारहाण झाली आहे. दगडफेक अन् राड्यामुळे अकोल्यातली अकोट फैल परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. या हल्ल्यात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोल्यातील राड्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. भाजपच्या दोन्ही गटातील समर्थकांना त्यांनी शांततेच आवाहन केले.

Violence after Akola municipal election results
Nashik results : नाशिकमध्ये ठाकरेंना अपयश, भाजपची एकहाती सत्ता, वाचा विजयी उमेदवारांची यादी

अकोल्यात महापालिका निवडणूक निकालानंतर अकोट फैल भागात रात्री जोरदार मोठा राडा झाला. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले. अकोट फैल पोलीस स्टेशनच्या समोरच हल्ला झाला. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. अनेक वाहनांची तोडफोड.. अनेक वाहन रस्त्यावरील पलटी केले आहेत.. रात्री अकोट फैल भागात दोन गटात राडा अन् मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

Violence after Akola municipal election results
Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

अकोट फैल परिसरात दगडफेक आणि राडा झाल्याचे व्हिडिओ 'सामTv'च्या हाती लागले आहेत.. या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत. इतर 3 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झाले.. विशेष म्हणजे भाजपच्या एका गटाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. गंभीर जखमी शरद तुरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अतिरिक्त कुमक मागवली असून अकोट फैल भागात तणावपूर्ण शांतता आहे..

Violence after Akola municipal election results
PCMC Candidate : भाजपच्या दादाने आखाडा जिंकला, काका-पुतण्याचा पराभव, वाचा आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

अकोला महापालिका एकूण पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 80 

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदेसेना : 01

अजित पवार राष्ट्रवादी : 01

शरद पवार राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

मनसे : 00

अकोला विकास समिती : 01

अपक्ष : 01

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com