Udayanraje Bhosale : रयत शिक्षण संस्था (rayat shikshan sanstha) साताराचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (kbp college satara) शिक्षक कर्मचारी हे आठवड्याभरापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. आज त्यांची खासदार उदयनराजे भाेसले यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना उदयनराजेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामाेल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. (Maharashtra News)
उदयनराजे (udayanraje bhosale) म्हणाले साता-याच्या (satara) राजघराण्याचा रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा राहिला आहे. या संस्थेच्या घटनेत राज्याचा जाे मुख्यमंत्री असेल ताे या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल असे हाेते. मात्र काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर (शरद पवार यांचा नामाेल्लेख टाळत) रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं आणि त्यामुळेच प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
ज्यांचा काेणाचे फार माेठे याेगदान नाही अशा लाेकांना संस्थेच्या संचालक मंडळात घेण्यात आले आहे असेही उदयनराजेंनी नमूद केले. दरम्यान यावेळी उदयनराजेंनी आंदाेलकांशी चर्चा देखील केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.