सातारा : खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी बुधवारी ट्विट करुन (tweet) आज एक मोठी घोषणा करणार असल्याचे जाहीर केले हाेते. राजेंच्या मनात नेमके काय आहे याची उत्सकुता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान राजेंनी केलेले ट्विट आणि फेसबुक पाेस्ट आज त्यांच्या वाढदिनी (udayanraje bhosale birthday) डिलीट झाल्या आहेत. (udayanraje bhosale latest marathi news)
यामुळे नेटीझन्समध्ये आजच्या कार्यक्रमांबाबत शंका निर्माण झाली. दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथून महाराज साहेबांना तुम्ही चांगलं आेळखता. त्यांनी एकदा सांगितलं म्हटले की बाेलणारच, बाकी काय आम्हांला माहिती नाही असे सांगण्यात आले.
दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले यांनी बुधवारी केलेल्या ट्विटमध्ये कोणता प्रश्न, काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस आमंत्रण देत आहोत.उद्या (ता. २४ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता गांधी मैदान (satara) येथे आपण उपस्थित रहावे असे आमंत्रण माध्यमांसह जनतेस देण्यात आले आहे.
उदयनराजेंनी (udayanraje bhosale) केलेली ट्विट आणि फेसबुक पाेस्ट जरी डिलीट करण्यात आली असेल तरीही उदयनराजे कमिटमेंट पाळणारच असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केल्या गेल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.