Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Uday Sangle joins BJP: उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी माणिकराव कोकाटेंवर “मी कबड्डीचा खेळाडू” म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केला.
UDAY SANGLE JOINS BJP, SLAMS MANIKRAO KOKATE WITH “KABADDI PLAYER, NOT JUNGLE RUMMY” COMMENT
UDAY SANGLE JOINS BJP, SLAMS MANIKRAO KOKATE WITH “KABADDI PLAYER, NOT JUNGLE RUMMY” COMMENTSaam Tv
Published On

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये तर एकमेकांना शह देण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष शहरात आपला पक्ष विस्तार करत असताना मात्र भाजपने आता ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

UDAY SANGLE JOINS BJP, SLAMS MANIKRAO KOKATE WITH “KABADDI PLAYER, NOT JUNGLE RUMMY” COMMENT
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे ₹१५०० उद्यापासून मिळणार

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सिन्नर येथील युवानेते उदय सांगळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतले. हा पक्षप्रवेश करण्याआधीच शरद पवार गटाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित पार पडला. प्रवेशादरम्यान उदय सांगळे यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला.

UDAY SANGLE JOINS BJP, SLAMS MANIKRAO KOKATE WITH “KABADDI PLAYER, NOT JUNGLE RUMMY” COMMENT
Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये, २५ दिवस बेड रेस्ट, नेमकं काय झालंय?

मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर कबड्डीचा' असं म्हणत उदय सांगळेंनी माणिकराव कोकाटेंवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच हल्लाबोल केला. सिन्नरमध्ये पाणी प्रश्न आणि तर समस्या कायम असल्याचं म्हणत कोकाटे यांच्यावर टीका केली.

UDAY SANGLE JOINS BJP, SLAMS MANIKRAO KOKATE WITH “KABADDI PLAYER, NOT JUNGLE RUMMY” COMMENT
Local Body Election : अजित पवार गट भाजप, शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत, धुळ्यात राजकारण तापणार

कोण आहे उदय सांगळे?

उदय सांगळे हे शिवसेना ठाकरे गटात होते. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे ते निकटवर्तीय होते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिन्नरची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटणार असल्याने सांगळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. या निवडणुकीत उदय सांगळे यांनी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना टक्कर दिली होती. उदय सांगळे यांनी कोकाटेंच्या विरोधात लाखभर मत मिळवली होती.

UDAY SANGLE JOINS BJP, SLAMS MANIKRAO KOKATE WITH “KABADDI PLAYER, NOT JUNGLE RUMMY” COMMENT
सांगलीमध्ये पुन्हा राजकारण तापलं; जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पॉलिटिकल वाॅर, नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जातीय समीकरणे विचारात घेऊन त्यांच्याशी दगाफटका केल्याचा आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील माणिकराव कोकाटे यांना छुप्याने मदत केल्याचा आरोप सांगळे यांनी केला होता. त्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक लक्षात घेऊन त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करताच त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार प्रहार केल्याने आता सिन्नरचे राजकारण अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com