Bhiwandi Accident : कामावरून परतताना डम्परने उडवले, २ तरुणांचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Bhiwandi Accident news : भिवंडी येथे वडोदरा महामार्गावर भीषण अपघात झाला. यात दोन तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेनं मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
वडोदरा महामार्गावर भिवंडी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू
two youths killed in bhiwandi dumper accident on vadodara highwaysaam tv
Published On

फय्याज शेख, भिवंडी | साम टीव्ही

वडोदरा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भिवंडी येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही कामावरून घरी परतत होते. त्याचवेळी एका भरधाव डम्परने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या पिराणी पाडा भागातील रहिवासी असलेला २० वर्षीय जिशान अन्सारी आणि धामणकर नाका येथील पटेल कंपाऊंडमध्ये राहणारा २५ वर्षीय इम्रान अन्सारी हे वॉलपेपर लावण्याचे काम करत होते. हे दोन्ही तरूण कामासाठी भिवंडीहून अंबाडीला गेले होते.

अंबाडीहून घरी परतत असताना वडोदरा महामार्गावर दाभाड परिसरात भरधाव डम्परने त्यांना धडक दिली. (Bhiwandi Accident) या भीषण अपघातात इम्रान आणि जिशान या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. दोघांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वडोदरा महामार्गावर भिवंडी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू
Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

पुलावरून दुचाकीसह कोसळले, दोघांचा मृत्यू

अहमदाबादच्या रानीप परिसरात मागील आठ दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन तरुणांनी जीव गमावला. बालोलनगर उड्डाणपुलावरून ते दोघेही दुचाकीसह खाली कोसळले होते. गुरुवारी दुपारी अतुल पांचाल हे दुचाकीवरून जात असताना दुभाजकाला धडकले. पुलाच्या रेलिंगवरून ते खाली रस्त्यावर पडले. पोलिसांत केलेल्या नोंदीनुसार, अतुल हे गांधीनगर जीआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होते. अतुल यांचा बालोलनगर उड्डाणपुलावर अपघात झाल्याचे शेजारील व्यक्तीने त्यांच्या भावाला सांगितले. त्यानंतर अतुल यांचे भाऊ महेश हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी अतुल यांची दुचाकी पुलावर होती. तर ते पुलाखालील रस्त्यावर पडले होते.

यापूर्वी ७ मे रोजी याच उड्डाणपुलावर अशीच एक अपघाताची घटना घडली होती. यात ४३ वर्षीय संजय मनु मकवाना यांचा मृत्यू झाला होता.

वडोदरा महामार्गावर भिवंडी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू
Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com