

Buldhana Accident News: बुलडाण्यातून अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. बुलडाण्यातील राजूर घाटात जीप आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोघे युवक जागीच ठार झाले आहे. या अपघातात मृत पावलेले दोघे तरुण नांदूरा तालुक्यातील शिरसोली येथील आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव जीपने दिलेल्या जबरदस्त धडकेत दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले आहे. हा अपघात बुलडाण्याजवळील राजूर घाटात आज सायंकाळी झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोन तरूण हे नांदूरा तालुक्यातील शिरसोली येथील आहेत. बुलडाणा – मलकापूर मार्गावरील राजूर घाटातील पहिल्या वळणावर हा अपघात झाला आहे.
दोन युवक दुचाकीने बुलडाण्याकडे येत होते. दरम्यान भरधाव येणाऱ्या जीपने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघां दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेले महेश मारोती मुर्हेकर (वय २८) , आत्माराम दुर्योधन भोलनकर (वय ३७) अशी मृतकांची नावे आहे. दोघे राहणार हे नांदूरा तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी आहे.
कोल्हापुरातही कारचा अपघात झाला. भरधाव असलेली चारचाकी उलटून ओढ्यात कोसळली. त्यानंतर या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रस्त्यावर ही घटना घडली आहे.
या अपघातात 22 वर्षीय आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. हे तिघेजण आपल्या चारचाकीतून अनफ खुर्द इथून अनफ बुद्रुकच्या दिशेने निघाले होते. मात्र दासेवाडी इथ आल्यावर आदीलचा भरधाव गाडीवरील ताबा सुटला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.