Chandrapur Flood: चंद्रपुरात अतिवृष्टीनंतर सखल भागातील नागरिकांना फटका; 700 हून अधिक नागरिकांना बोटीद्वारे काढण्यात आलं बाहेर

चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनंतर इरई नदीच्या बॅकवॉटरचा शहरातील सखल भागातील नागरिकांना फटका बसला आहे.
Chandrapur Flood
Chandrapur FloodSaam tv

Chandrapur News: चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनंतर इरई नदीच्या बॅकवॉटरचा शहरातील सखल भागातील नागरिकांना फटका बसला आहे. सुमारे 700 हून अधिक नागरिकांना बोटीद्वारे काढण्यात बाहेर काढण्यात आले. सखल भागातील राजनगर- सहारा पार्क -सिस्टर कॉलनी- रहमतनगर या भागात पुराचा अधिक फटका बसला आहे. बॅक वॉटरमुळे धोका वाढला, तर इरई धरणाची दारे उघडल्याने स्थिती अधिक बिकट झाली. (Latest Marathi News)

चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय चंद्रपूर शहरालगत धरणाची दारे उघडल्याने शहरातील सखल भागात इरई नदीचे पाणी शिरण्यास प्रारंभ झाला.

सकाळपासून या नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, मनपाचे पथक, पोलीस पथकांनी यासाठी प्रयत्न केले. चंद्रपूर शहरातील सखल भागात नव्या वसाहतींमध्ये पाणी शिरण्यास प्रारंभ झाला तसतसा बचाव कार्याचा वेग देखील वाढला.

Chandrapur Flood
Accident News in Kolhapur : कोल्हापुरात भरधाव चारचाकी ओढ्यात कोसळून दोघे ठार, नवी कार घरी आणण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं

आज पहाटेपासून चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. एकीकडे अतिवृष्टी दुसरीकडे धरणाची दारे उघडण्याची वेळ तर तिसरीकडे वर्धा व वैनगंगा नद्या दुथडी धरून वाहत असल्याने इरई नदीचे पाणी त्यात समाविष्ट झाले नाही.

परिणामी हे पाणी उलट दिशेने चंद्रपूर शहराच्या विविध भागात पोहोचले. अचानक पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे नागरिकांना बाहेर निघण्याची उसंत मिळाली नाही. बचाव पथकाने या सर्वच भागांमध्ये बोटीद्वारे बचाव मोहीम चालविली आहे.

Chandrapur Flood
Maharashtra Rain Forecast : उद्या राज्यात पाऊस कसा असेल? कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज

बचाव पथकाने आणलेल्या सर्वच पूरग्रस्त नागरिकांना निवास व भोजनाची व्यवस्था मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. इरई धरणाची आता चार दारे उघडण्यात आली असून, इरई नदीकाठच्या सर्वच गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज संध्याकाळपुरती या भागातील बचाव मोहीम थांबविण्यात आली असून, उद्या सकाळी पाणी पातळी वाढल्यास पुन्हा एकदा वेगवान बचाव कार्याला सुरुवात होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com