Accident News in Kolhapur : कोल्हापुरात भरधाव चारचाकी ओढ्यात कोसळून दोघे ठार, नवी कार घरी आणण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Kolhapur News : नवीन चारचाकी आणण्यापूर्वीच आदिलसह जहीर याच्यावर काळाने घाला घातला.
Kolhapur News
Kolhapur News Saam TV

रणजीत माजगावकर

Kolhapur News : भरधाव असलेली चारचाकी पलटी मारत ओढ्यात कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रस्त्यावर ही घटना घडली आहे.

यामध्ये तांबळे अनुप खुर्द येथे राहणारे 22 वर्षीय आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत.

तर साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. आज दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण आपल्या चार चाकीतून अनफ खुर्द इथून अनफ बुद्रुकच्या दिशेने निघाले होते. मात्र दासेवाडी इथ आल्यावर आदीलचा भरधाव गाडीवरील ताबा सुटला. (Tajya Batmya)

Kolhapur News
Hingoli News : मध्यरात्री नागरिक सतर्क झाले अन् ३५० जणांचा जीव वाचला

त्यानंतर गाडी पलट्या मारत एका पुलावरून ओढ्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाला. (Maharashtra News)

Kolhapur News
Pandharpur water Shortage News : पंढरपुरात पावसाळ्यात पाणीटंचाई; गावांना टँकरने पाणीपुरवठा, पशुधनही धोक्यात

आज सायंकाळी आदिल आपल्या कुटुंबियांसमवेत कोल्हापूरला नवीन चार चाकी आणण्यासाठी जाणार होता. मात्र नवीन चारचाकी आणण्यापूर्वीच आदिलसह जहीर याच्यावर काळाने घाला घातला.  (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com