Accident
Accidentअभिजित घोरमारे

बसच्या धडकेत दुचाकीस्वार पोलिसाचा मृत्यु! भंडारा शहरातील घटना...

बसच्या धडकेत ऍक्टिव्हा चालक पोलिसाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
Published on

अभिजित घोरमारे

भंडारा: बसच्या धडकेत ऍक्टिव्हा चालक पोलिसाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

धूलिनचंद बरवैय्या (वय 47) असे मृत पोलिसाचे नाव आहे. धूलिनचंद बरवैय्या हे गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तिरोडा पोलिसात हवलदार पदावर कार्यरत असून ते मुळचे भंडारा शहरातील (Bhandara) समता नगर येथील रहिवासी होते. सध्या ते सुट्टीवर असल्याने भंडारा आपल्या मुळगावी आले होते.

Accident
दारूच नाही तर 'या' गोष्टी देखील तुमचे लिव्हर खराब करतात! जाणून घ्या

या दरम्यान, घरुन काही सामान घेण्यासाठी गेले असता राजीव गांधी चौकात भंडारा आगरातून रामटेकसाठी सुटलेल्या बसने धुलीचंद यांना आमरासमोर धडक दिली. धडक इतकी जबर होती कि ते चक्क बसच्या रेडिएटरला आदळले. यात ते गंभीर जखमी होत त्यांचा मृत्यु झाला. लागलीच यांची माहिती शहर पोलिसांना देत बस चालकाला ताब्यात घेत मुतदेह उत्तरोत्तरिय तपासणीसाठी भंडारा सामान्य रुग्णालयात पाठविन्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com