दारूच नाही तर 'या' गोष्टी देखील तुमचे लिव्हर खराब करतात! जाणून घ्या

जर तुम्ही यकृताची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.
Liver Care, reasons for liver failure, liver failure causes
Liver Care, reasons for liver failure, liver failure causesSaam Tv
Published On

यकृताला आपल्या शरीराचा केमिकल फॅक्टरी म्हणले जाते. कारण ते रक्तातील रसायनांची पातळी राखण्यासाठी चोवीस तास काम करत असते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा एकल अवयव आहे. परंतु लोक यकृताच्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत आणि अशा अनेक गोष्टी करतात, ज्यामुळे यकृत खराब होऊ लागते.त्यामुळे लोकांना त्या सवयींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे, ज्यामुळे यकृत हळूहळू खराब होऊ शकते. (liver failure causes)

जर तुम्हाला तुमचे यकृत निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही काय आहार घेत आहेत आणि काय नाही हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. तसेच तुमच्या यकृतासाठी कोणते अन्न फायदेशीर आहे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या यकृताला हानी पोहोचवू शकतात हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. तसेच हे सर्वज्ञात आहे की जास्त प्रमाणात मद्यपान आणि लठ्ठपणामुळे यकृताशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

जर तुम्हाला तुमचे यकृत निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही चुकूनही या गोष्टींचे सेवन करू नका.

साखर;

जास्त साखर फक्त तुमच्या दातांसाठीच हानिकारक नाही तर ते तुमच्या यकृतालाही नुकसान पोहोचवू शकते. यकृत चरबी बनवण्यासाठी फ्रक्टोज नावाची साखर वापरत असते. रिफाईंड साखर आणि उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरपचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृतच्या संबंधित रोगांचा धोका वाढू शकतो. तज्ञांनुसार, काही अभ्यासात असे आढळून आले आहे की साखर यकृताला अल्कोहोलप्रमाणेच नुकसान करते.

अ जीवनसत्वाचे जास्त प्रमाणात सेवन;

आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज असते, त्यातील एक जीवनसत्त्व म्हणजे अ (Vitamin A). शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता ताजी फळे आणि भाज्यांनी भरून काढता येते. लाल, केशरी आणि पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते. पण बरेच लोक शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात. व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्सचा जास्त डोस घेतल्यास यकृताचा आजार होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स घ्यायची असतील, तर एकदा नक्कीच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Red Meat;

तुमच्या यकृताला प्रथिने असलेले लाल मांस (Red Meat) पचवणे खूप कठीण आहे. यकृतासाठी प्रथिने तोडणे सोपे नसल्यामुळे, जास्त प्रथिने असलेले लाल मांस खाल्ल्यामुळे यकृताशी संबंधित रोगांचा धोका वाढू शकतो.

पेनकिलर;

अनेकदा लोक डोकेदुखी किंवा शरीर दुखत असताना पेनकिलरचा वापर करतात. अशा परिस्थितीत तुम्ही किती वेदनाशामक औषधांचे सेवन करत आहात हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकून त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा तुमच्या यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या यकृतालाही नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वेदनाशामक औषधांचा वापर करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com