

एकीकडे मुंबईतल्या गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली रेव्ह पार्टी आणि झोम्बी ड्रग्जचं प्रकरण गाजत असताना आता धक्कादायक बातमी समोर येतेय. पश्चिम महाराष्ट्र आता ड्रग्ज आणि गांजा तस्करीचं मुख्य केंद्र बनत असल्याचं समोर आलंय. कोल्हापूर परिक्षेत्रात गांजा, एमडी ड्रग्ज, चरस, कोकेनची नशा हातपाय पसरत आहे. या तस्करीचं गुजरात, हैदराबाद, दिल्ली कनेक्शन समोर आलंय. गेल्या सव्वा वर्षातील पोलिसांच्या कारवाईवर नजर टाकली तर तरुणाई नशेच्या विळख्यात कशी सापडली आहे त्याचं धक्कादायक वास्तव समोर येतं.
दाखल गुन्हे 674
अटक 924
गांजा 3,470 किलो
अफू 1,427 किलो
एम.डी.ड्रग्ज 16 किलो
मुद्देमालाची किंमत 68 कोटी
ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. सीमावर्ती भागातून होणारी गांजाची तस्करी, सांगली-कराडमध्ये निर्जन ठिकाणी उभारलेले ड्रग्ज निर्मिती कारखाने आणि तरुणांच्या पार्ट्यांमध्ये उपलब्ध होणारा ड्रग्जसाठा चिंतेची बाब आहे. कर्नाटक, राजस्थान, ओडिशा, पश्चिम बंगालमधून गांजा मागवला जात आहे. परंतु, त्याच्या मूळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झालेले नाही. तस्करीमध्ये तरुणांचाच मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सुरुवातीला नशेच्या आहारी गेलेलेच काही जण तस्कर बनले आहेत.
गुजरात, हैदराबादमध्ये काही तस्करांनी महाराष्ट्रातून गांजा मागविल्याची कबुली दिल्याने परराज्यातील तपास पथके इथपर्यंत पोहोचली आहेत. ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हास्तरावर केवळ बैठका घेऊन उपयोग नाही तर कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्याशिवाय तरुणांभोवतीचा ड्रग्जचा विखळा सुटणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.