Aadvay Hiray News : ठाकरे गटाच्या उपनेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण

मालेगावात गेल्या काही वर्षांपासून हिरे विरूध्द भुसे यांचे राजकीय वैर सर्वांनाच सर्वश्रुत आहे.
advay hiray
advay hiraysaam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik News : नाशिकच्या मालेगाव येथील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) उपनेते अदव्य हिरे यांच्यासह ३२ जणांवर फसवणूक करुन दिशाभूल केल्या प्रकरणी सटाणा व मालेगावच्या आयोशा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

advay hiray
Baramati News : गाेळीबाराने बारामती हादरले ! दाेघे जखमी, ग्रामस्थांनी धाडसाने एकास धरले; ज्वेलर्सवरील संकट टळले

महात्मा गांधी विद्या मंदीर संचलीत आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत काही लोकांकडून हिरे यांच्या काही समर्थकांनी मोठ्या रकमा घेतल्या होत्या. मात्र नोकरी तर दूरच पैसे पण पुन्हा मिळत नसल्याने अदव्य हिरे यांच्या विरोधात त्यावेळी उठाव झाला.

मात्र अदव्य हिरे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचे जूने प्रकरण पुन्हा उघडीस येऊ लागले. त्याला कारण ठरले पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात हिरे यांनी घेतलेला भूमिका.

advay hiray
Bus Concession For Women : अय्या खरंच...पण कूठं ! खासगी ट्रॅव्हल्समध्येही महिलांना 50 टक्के सवलत (पाहा व्हिडिओ)

गेल्या आठवड्यात उध्दव ठाकरे यांची मालेगावात सभा असतानाच फसवणूक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले होते. त्या अगोदरच नाशिकच्या सटाणा पोलिस स्थानकात अद्वय हिरे व त्याच्या काही सहका-यांच्या विरोधात सटाणा पोलिसात तक्रार दाखल झाली.

दुस-याच दिवशी फसवणूक झालेल्या लोकांनी महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन केले होते. दुपार नंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना योग्य ती कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

advay hiray
Lasalgaon News : आजपासून लासलगाव बाजार समितीचे व्यवहार बंद; जाणून घ्या कारण

हिरे यांच्या रेणूकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर ३२ कोटींची थकबाकी असताना बँकेची दिशाभुल केल्या प्रकरणी आयोशानगर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मालेगावात गेल्या काही वर्षां पासून हिरे विरूध्द भुसे यांचे राजकीय वैर असले तरी हिरे यांची उध्दव ठाकरे यांनी उपनेतेपदी झालेली निवड आणि त्यातून होणारे एकमेकांवरील करण्यात येणा-या राजकीय आरोपांमुळे मालेगावात विविध चर्चांना सुरुवात झालीय.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com