Bus Concession For Women : अय्या खरंच...पण कूठं ! खासगी ट्रॅव्हल्समध्येही महिलांना 50 टक्के सवलत (पाहा व्हिडिओ)

या निर्णायाने महिला प्रवासी वाढतील अशी आशा बस चालकांना आहे.
Nanded News, Bus Concession For Women
Nanded News, Bus Concession For Womensaam tv
Published On

- संजय सूर्यवंशी

Nanded News : एसटी महामंडळाने महिलांसाठी बसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यापाठाेपाठ आता नांदेडच्या खासगी बस चालकांनी (Nanded Private Bus Operators) देखील महिलांना प्रवास शुल्काच्या दरात 50 टक्के सवलत (Bus Concession For Women) देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा महिलांना हाेईल. त्या खासगी बसने प्रवास करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maharashtra News)

Nanded News, Bus Concession For Women
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

राज्य शासनाने महिलांचा सन्मान करत एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी तिकीट दरात अर्थसंकल्पात 50 टक्के सवलतीची घोषणा केली. या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली. त्यामुळे एसटी बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.

Nanded News, Bus Concession For Women
Maharashtra Weather : एप्रिल महिन्याची सुरुवात होईल पावसाने, पुढील ५ दिवस पाऊस

दरम्यान या निर्णयाचा फटका खासगी बस चालकांना बसला आहे. महिलांनी खासगी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी बस चालकांनी देखील महिला प्रवाशांसाठी बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिला प्रवासी वाढतील अशी अपेक्षा खासगी बस चालकांना आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com