Maharashtra Weather : एप्रिल महिन्याची सुरुवात होईल पावसाने, पुढील ५ दिवस पाऊस

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam Tv

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने हवामानत बदल जाणवत आहेत. कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर बदलत्या हवामानाचा परिणाम आता पिकांवर होत आहे. सोबतच त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. 30 आणि 31 मार्च रोजी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. (Latest Marathi News)

Maharashtra Weather
Sanjay Raut Death Threat: संजय राऊत यांना झेड प्लस सिक्यूरिटी द्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी; अमित शाहांशी बोलणार

त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहिल. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 6 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलडाणा, वर्धा आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. (Weather Update)

Maharashtra Weather
Raigad Crime News : माणगाव म्हसळा रस्त्यावर फिल्मी स्टाइल चाेरी; 5 लाख 57 हजारांची लूट

महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्हे यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसून येईल.

दरम्यान, 2 एप्रिलपासून दुपारच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेय. मात्र, हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपिटीमुळे गहू व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पिके पक्व होण्यासही उशीर झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com