Shocking News : गणेश विसर्जनावेळी २ मुलांचा बुडून मृत्यू; अकोला, इंदापुरातील घटनेनं हळहळ, नेमकं काय घडलं?

Tragedy News : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. अकोला येथील १८ वर्षीय तरूण आणि इंदापूर येथील १६ वर्षांच्या मुलाचा यात समावेश आहे.
इंदापूर येथील निरा नरसिंहपूरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा शोध घेत असताना नदीकाठावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते.
इंदापूर येथील निरा नरसिंहपूरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा शोध घेत असताना नदीकाठावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते. saam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला / मंगेश कचरे, बारामती | साम टीव्ही

Shocking News in Akola and Indapur : धुळ्यातील चितोडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी ट्रॅक्टरखाली सापडून तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने अवघ्या तालुक्यात हळहळ व्यक्त होत असतानाच, अकोला आणि इंदापुरातही गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. अकोल्यातील म्हैसांग येथे १८ वर्षांचा तरुण बुडाला. तर इंदापुरातील निरा नरसिंहपूर येथील १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला.

पाण्याचा अंदाज आला नाही अन्...

अकोल्यातील (Akola News) म्हैसांग येथील पूर्णा नदीवर ही दुर्दैवी घटना घडली. गणेश विसर्जनाला १८ वर्षीय तरुण गणेश गायकवाड गेला होता. अकोल फेल भागात राहणारा गणेश दुपारनंतर आईसोबत घरगुती गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी म्हैसांग येथे पूर्णा नदीवर गेला होता. तो पाण्यात उतरला. पण त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.

इंदापूर येथील निरा नरसिंहपूरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा शोध घेत असताना नदीकाठावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते.
People Drowned During Ganesh Visarjan : गणेश विसर्जनादरम्यान भीषण दुर्घटना; ८ जणांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

गणेश हा नदीच्या पाण्यात बुडाला. गणपती विसर्जनासाठी आलेल्या इतर नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढलं. त्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेलं. पण तिथं तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अकोल्यातील या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अशा दुर्घटना टाळण्यासाठी गणेशभक्तांनी विसर्जनावेळी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

घाटावर विसर्जनासाठी गेला पण...

बारामतीतील इंदापुरातील निरा नरसिंहपूर येथे अशीच एक दुर्दैवी घटना घडली. येथील सोळा वर्षीय अनिकेत कुलकर्णी या मुलाचा बुडून मृत्यू झाला. तो गणपती विसर्जनासाठी घाटावर गेला होता.

इंदापूर येथील निरा नरसिंहपूरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा शोध घेत असताना नदीकाठावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते.
Pune : दुर्दैवी ! पोरगं बुडतंय म्हणून बाप धावला, गणरायाला निरोप देताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू

इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र निरा नरसिंहपूर येथील निरा नदीवर अनिकेत गणेश विसर्जनासाठी गेला होता. त्यावेळी तो नदीच्या पाण्यात बुडाला. प्रशासनानं त्याचा शोध सुरू केला. ही घटनेची माहिती मिळताच, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घाटावर आले होते. अनिकेत हा मागील नऊ वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह वेदपाठ शाळेत शिक्षण घेत होता. तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील हांडुग्री गावचा होता.

धुळ्यात मनाला चटका लावणारी घटना

धुळ्यातील चितोड येथेही मन हेलावणारी दुर्घटना घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली सापडून तीन मुलांचा मृत्यू झाला. तर याच घटनेत इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com