तुळजाभवानी मंदिरात मटका किंगला VIP ट्रीटमेंट, प्रवेश बंदीनंतरही मटका किंग गाभाऱ्यात, भाविक ताटकळत, मटका किंगसाठी पायघड्या

Tuljabhavani Temple VIP Controversy: व्हीआयपी संस्कृतीमुळे तुळजाभवानी मंदिरात नवा वाद उफाळून आलाय...हजारो भक्त तुळजाभवानीच्या रांगेत ताटकळत असताना एका मटका किंगला मंदिरातील गाभाऱ्यात थेट प्रवेश दिल्यानं वाद निर्माण झालाय? कोण आहे हा मटका किंग? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Tuljabhavani temple VIP entry controversy during Navratri 2026
Tuljabhavani temple VIP entry controversy during Navratri 2026saam tv
Published On: 

संपूर्ण देशात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय...सोलापूरातील मटका किंग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीनं थेट देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून फोटोसेशन केलय..... या घटनेमुळे तुळजापूर देवस्थानच्या कारभारावर आणि व्हीआयपी संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय...नेमका काय घडलंय पाहूयात..

नवरात्रोत्सवात सामान्य भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी आहे

देवीचे मौल्यवान दागिने आणि अलंकारांची सुरक्षा यामुळे भाविकांना गाभाऱ्यात प्रवेशबंदी घालण्यात आलीय...

अशातच सोलापूरातील अरुण रोडगे या मटका किंगला थेट गर्भागृहात प्रवेश देण्यात आला.

राजकीय वशिलेबाजी आणि बनावट पासेसच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचा भोपे पुजारी मंडळाचा आरोप

दरम्यान याप्रकरणात भोपे पुजारी मंडाळानं स्थानिक आमदार आणि त्याच्या स्वीय सहाय्यकाच्या वशील्यानं हा प्रकार घडल्याची तक्रार जिल्हाधिकारी तसंच मंदिर अध्यक्षांकडे केलीय..एकीकडे मटका किंगला गाभाऱ्यातील प्रवेशासाठी थेट आमंत्रण दिलं जात असताना दुसरीकडे भाविकांना 4 ते 5 तास रांगेत उभं राहांव लागतेय.. त्यात पैसे घेऊन मंडळातील पुजारी थेट मंदिरात प्रवेश देत असल्याचा आरोपही भाविकांनी केलाय...

दरम्यान भोपे पुजारी मंडळाच्या आरोपानंतर स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिलेत...

तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात जो प्रकार घडला. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना सूचना दिलेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल.

सर्वसामान्य भाविक उन्हातान्हात रांगेत तिष्ठत असताना, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींसाठी पायघड्या घातल्या जात असल्याने भाविक संतप्त झालेत... आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग नेमकी काय भूमिका घेतात आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com