रोहिदास घाडगे, साम टीव्ही
राज्यातील रेस्टॉरंट, दूध भेसळ, पनीर नामांकित ब्रॅंडचे आउटलेटवर धडाकेबाज कारवाई करत थेट परवाना निलंबन करणाऱ्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात खाद्य पदार्थ विक्रीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अशातच शाळेच्या पोषण आहारामुळे देखील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहे. याच प्रकरणाची आता तुकाराम मुंढे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार आहार मिळावा यासाठी Safe Food for Every School Child in Maharashtra या राज्यव्यापी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी १७ ऑगस्ट रोजी राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच FDAचे विभागीय सहआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक बाबींवर यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.
खेड, आंबेगाव आणि जुन्नरसह पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहारावरही आता FDAची थेट नजर राहणार आहे. यानंतर शालेय पातळीवर केंद्रप्रमुख स्तरावरही बैठक घेऊन पोषण आहाराचा दर्जा, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या ताटातील आहार सुरक्षित आणि दर्जेदार ठेवण्यासाठी आता FDAचा थेट वॉच राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.