Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा जबरदस्त धसका! ते येणार असल्याची नुसती बोंब उठली, धडाधड पानटपऱ्यांचे शटर बंद

Pan Shop Close In Nanded: तुकाराम मुंढे नांदेडमध्ये तपासणीसाठी येणार असल्याची अफवा पसरल्यानंतर अनेक पान टपऱ्या बंद करण्यात आल्या. एफडीएच्या गुटखा, तंबाखू आणि प्रतिबंधित पदार्थांवरील धडक कारवाईमुळे दुकानदारांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
Pan Shop Close In Nanded:
TUKARAM MUNDHE FEAR GRIPS NANDED; PAN SHOPS SHUT DOWN AFTER FDA RUMOURSsaam tv
Published On

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा धडका लावला आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईची धास्ती एवढी आहे की, साहेब तपासणीसाठी येणार असल्याची साधी बातमी कानी आली तरी दुकानदारांना तारे दिसायला लागतात. अशीच काहीशी घटना नांदेडमध्ये घडली आहे.ti

Pan Shop Close In Nanded:
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा राज्यभरात धडाका; शिर्डीनंतर शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAचा छापा

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची अफवा अख्खा शहरभर पसरली. अफवा ऐकूनच शहरातील अनेकांनी पान टपऱ्या धडधड बंद केल्या. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर देखील कारवाया सुरू केल्या. त्याची धास्ती पान टपरी चालकांना आहे. त्यातच आज तुकाराम मुंढे नांदेडला आले असल्याची अफवा नांदेड शहरात पसरली आणि दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या बंद झाल्या. कारवाईच्या भीतीपोटी अनेकजण टपऱ्या बंद करून टपरी चालक पसार झालेत.

अफवेने मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद

नांदेडप्रमाणे बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातही अशीच गत झाली. मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगावा काहींच्या मोबाईलवर 'एफडीएचे साहेब येणार' असा मेसेज फिरला. सोशल मीडियावरील हा मेसेज व्हायरल होताच संपूर्ण बाजारपेठ काही मिनिटांत बंद झाली.किराणा, मिठाई दुकानांसह पानटपऱ्या आणि हॉटेल्स चालकांनी दुकाने बंद करून पळ काढला. अवैध गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्या टपरी चालकांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाची मोठी दहशत निर्माण झालीय.

Pan Shop Close In Nanded:
आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

भीतीपोटी फेकल्या पेप्सी

अकोल्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीनं अज्ञात दुकानदारांनी हजारो रुपयांच्या पेप्सी रस्त्याच्या बाजुला फेकून दिल्या. अकोलामधील पळसोद फाट्या दरम्यान, हजारो पेप्सी आढळून आल्या. कुणीतरी अज्ञात दुकानदारांनी संपूर्ण पेप्सीचा माल फेकून दिला . आज अकोल्यातल्या चौहट्टा बाजार येथे विविध भागात अन्न व औषध विभागाच्या पथकाकडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com