त्या एका वाक्यानं बदललं तुकाराम मुंढेंचं आयुष्य; IAS झाल्यावर आईने नेमकं काय सांगितलं होतं?

Tukaram Mundhe Mother Death Emotional Story: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आईच्या निधनानंतर पर्यावरणपूरक पद्धतीने वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन केले. आईच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
IAS officer Tukaram Mundhe gets emotional during his mother’s funeral, later honoring her memory through tree plantatio
IAS officer Tukaram Mundhe gets emotional during his mother’s funeral, later honoring her memory through tree plantatioSaam tv
Published On

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंढे परिवाराने अस्थिविसर्जन पाण्यामध्ये न करता घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करून त्या ठिकाणी केले. पर्यावरणाला कोणतीही हानी न होता आईच्या स्मृती आयुष्यभर स्मरणात राहाव्यात यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. याबरोबरच आईच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

IAS officer Tukaram Mundhe gets emotional during his mother’s funeral, later honoring her memory through tree plantatio
बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

माझे आयएएस (IAS) म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर आईने मला एकच गोष्ट सांगितली होती की जेवढ्या जास्तीत जास्त लोकांचे भले करता येईल तेवढे भले कर त्यामुळे आजवर त्याच मार्गावर मी चालत आलो आहे आणि यापुढे देखील त्याच मार्गावर चालणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. यावेळी तुकाराम मुंढे यांचे भाऊ सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे हे देखील उपस्थित होते.

IAS officer Tukaram Mundhe gets emotional during his mother’s funeral, later honoring her memory through tree plantatio
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही- देवेंद्र फडणवीस

आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे नुकतेच निधन झाले आहे. बीड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी ताडसोन्ना येथे त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

IAS officer Tukaram Mundhe gets emotional during his mother’s funeral, later honoring her memory through tree plantatio
Prajakta Tanpure : तनपुरेंनी उमेदवारी अर्ज का भरला नाही? फडणवीसांचे नाव घेत सांगितलं कारण...

प्रशासनात कडक शिस्त आणि नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचे एक अत्यंत हळवे रूप संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आईच्या पार्थिवासमोर जाताच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आणि आपल्या भावाच्या गळ्यात पडून ते ढसाढसा रडले. ज्या अधिकाऱ्याच्या नावाने भ्रष्ट यंत्रणा थरथर कापते, तोच अधिकारी आज आपल्या आईच्या निधनाने एखाद्या लहान मुलाप्रमाणे व्याकुळ झालेला पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

आसराबाई मुंढे यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताडसोन्ना गावासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंढे यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांत्वन देताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com