

एकीकडे राजधानी दिल्लीत ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पेटलेल असताना महाराष्ट्रातही MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पेटलं. अखेर पुण्यात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या ठिय्याला 11 व्या दिवशी यश आलं. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय. विशेष म्हणजे चौकशी समितीच्या सचिवपदी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीची घोषणा मंत्री शिवेद्रराजे भोसलेंनी करातच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. याशिवाय आंदोलक विद्यार्थांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवारांनी ट्विट करुन काय प्रतिक्रीया दिली ते पाहूया. MPSC पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
MPSCमधील सुधारणेसाठीच्या चौकशी समितीत 5 सदस्यांचा समावेश
तुकाराम मुंढे हे चौकशी समितीचे सचिव म्हणून काम पाहणार
MPSCच्या सर्व परीक्षा ऑफलाईन होणार
प्रत्येक परिक्षा वेळेत घेण्यात येणार
रखडलेली भरती तत्काळ पूर्ण करण्यात येणार
वेटींग लिस्टबाबतचीही मागणी मार्गी लावणार
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार
3 वर्षात रिक्त पदं भरण्यात येणार
2027 'गट ब'च्या जागा वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक
'वन कार्ड' योजना मान्य, यासंदर्भात व्ही. राधा समिती निर्णय घेणार
चौकशी समितीची सूत्रं मुंढेंकडे दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज्यातल्या अन्न आणि औषधांमधल्या भेसळीचे रॅकेज उद्ध्वस्त करणारे तुकाराम मुंढे एमपीएससीतल्या भेसळीखोरांचाही पर्दाफाश करणार का? आणि आयोगाचा कारभार पारदर्शक होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.