
Nanded Sachin Vanaje News in Marathi : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नांदेडचे जवान सचिन यादवराव वनंजे शहीद झाले. श्रीनगरमध्ये कर्तव्यावर असताना त्यांचा ६ मे रोजी अपघाती मृत्यू झाला. सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात देगलूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. अंत्यसंस्काराला स्थानिक नेते, खासदार आणि आमदार देखील उपस्थित होते.
भारत - पाकिस्तानामध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारतीय जवान मोठ्या प्रमाणात सीमेवर तैनात आहेत. यावेळी नांदेडमधील जवान सचिन यादवराव वनंजे हे देखील तैनात होते. मात्र, कर्तव्य बजावत असताना त्यांची गाडी दरीत कोसळली आणि अपघाती मृत्यू झाला.
जवान सचिन शहीद झाल्यानंतर त्यांचा मृतदेह विमानाने श्रीनगरवरून नांदेडला पाठवण्यात आला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी काढलेल्या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवावर साश्रुनयनांनीदेगलूरमधून प्रत्येक चौकात फुलांची उधळण करण्यात आली.
साश्रुनयनांनी सचिन वनंजे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी भरले होते. ]भारत माता की जय'च्या नाऱ्याने परिसर घुमला. सचिन वनंजे यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्याची मुलगी, दोन भाऊ, आई - वडील असा परिवार आहे. सचिन यांच्या जाण्याने ८ महिन्यांची मुलगी पोरकी झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.