धुळवडीसाठी ४ मित्र कारने निघाले, वाटतेच काळाचा घाला; बीडमध्ये भयंकर अपघात

beed accident news : धुळवडीसाठी निघालेल्या मित्रांचा कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाच मृत्यू झाला.
Beed accident
representative imageSaam tv
Published On
Summary

बीडमध्ये धुळवडीसाठी जाताना अपघात झाला

कार विहिरीच्या कठड्याला धडकली

बीड शिरूर रोडवर हा अपघात झाला

धुळवड साजरी करायला जाणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळवडीसाठी कारने निघालेल्या मित्रांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. बीड ते शिरूर रोड परिसरात ही घटना घडली आहे. अपघाताच्या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळवड साजरी करण्यासाठी निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार झाला. तर तिघे जखमी झाले. ही घटना बीड ते शिरूर रोडवर रायमोहजवळ घडली. कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धुळवडीचा सण साजरा करायला वाटरपार्कला जात होता.

Beed accident
मुंबईच्या हवेचा 'कॅन्सर' रिपोर्ट; प्रदूषणामुळे मुंबईकरांना फुफ्फुसाचा कॅन्सर, VIDEO

नेमका कसा घडला अपघात?

बीडमधील मित्र मध्यरात्री कारने बीड ते शिरूर रोडवरून जाताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार रस्त्याच्या बाजूला उलटून थेट एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा जागीच ठार झाला. तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण यामध्ये जखमी झाले. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक कार होती. त्या कारमधील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातामधील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

Beed accident
तालिबाननं घेतला एअरस्ट्राइकचा बदला; आता युद्ध भडकणार? VIDEO

दरीत पाय घसरून पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू

सातारा शहरालगत असलल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर दगड फोडण्याचे काम करणाऱ्या मजुराचा दोनशे फूट खोल दरीत पाय घसरून पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने दोनशे फूट खोल दरीतून मजुराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com