नागपूरमध्ये भीषण अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; एक न्यायाधीशांचा, दुसरा वकिलाचा लेक

Nagpur accident today : नागपूरमध्ये वर्धा रोडवर झालेल्या भीषण अपघातात दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. खाणीच्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून मदत उशिरा मिळाल्याने दोघांचा जीव गेला.
Nagpur accident today
Nagpur accident today साम टीव्ही
Published On

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय. हे दोन्ही विद्यार्थी विधी विद्यापीठात शिक्षण घेत होते. नागपूर-वर्धा या मार्गावर अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या अपघातानंतर नागपूरमधील विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.

नागपूरमधील वर्धा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के यांचा मृत्यू झालाय. दोघेही २० वर्षीय विद्यार्थी होते. यामधील एक न्यायाधीशांचा, दुसरा वकिलाचा मुलगा होता. या दुर्घटनेमुळे नागपूरमधील विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम आणि आर्यन हे दोघेही डोंगरावर शिवारात जेवणासाठी गेले होते. परत येत असताना त्यांच्यावर काळाने घातला.

Nagpur accident today
Gold Rate Today : अखेर सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला करा खरेदी; 24k, 22k, 18k गोल्डचे ताजे दर

सक्षम आणि आर्यन डोंगरावर बुलेटने जेवण्यासाठी गेले होते. परत येत असताना खाणीचा खड्डा लक्षात न आल्याने आणि अंधार असल्यानं मदत मिळू शकले नाही. खाणीमुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली अन् अपघात झाला. अधांर असल्याने रात्रभर जखमी अवस्थेत पडूनच राहिले, वेळीच मदत न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur accident today
भाजप आमदाराच्या मुलाने ५ जणांना उडवले, व्हिडिओ काढणाऱ्यांनाही धमकावले, धक्कादायक प्रकार

सकाळी मित्रांच्या शोधातून घटना उघड झाली. मजुरांना खड्यात दोघेही रक्तबंबाळ दिसले. नागपूरमधील एम्समध्ये दोघांनाही नेले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. वसतीगृहातून रात्री बाहेर कसे गेले? नेमके कुठे गेले होते याचा तपास पोलीस करणार आहेत.

Nagpur accident today
हृदयद्रावक! वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टार सोनाली जाधवचा शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com