Alibaug: खेळता-खेळता स्विमिंग पूलजवळ गेली अन् पाण्यात पडली; २ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

Swimming Pool Accident Claims Life of 2-Year-Old Girl in Alibaug: फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये पडून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. अतिक्षा सुरेंद्रकुमार दास असे या चिमुकलीचे नाव असून, ती संबंधित फार्महाऊसवरील केअरटेकरची मुलगी होती.
Alibaugh
AlibaughSaam TV
Published On

आता एक धक्कादायक बातमी अलिबागमधून समोर येत आहे. फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये पडून दोन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही चिमुकली फार्महाऊसवरील एका केअरटेकरची मुलगी होती. चिमुकली पाण्यात पडल्यानंतर तिला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तसेच तिला तातडीने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला. डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

अतिक्षा सुरेंद्रकुमार दास असे चिमुकलीचे नाव आहे. दैनंदिनप्रमाणे ती फार्महाऊसच्या आवारात खेळत होती. पालकांचे लक्ष नसताना ती स्विमिंग पूलच्या दिशेनं गेली. मात्र, फरशीवरील ओलाव्यामुळे तिचा पाय घसरला आणि ती थेट स्विमिंग पुलच्या पाण्यात पडली. काही वेळानंतर मुलगी दिसेनाशी झाल्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. संपूर्ण फार्महाऊसमध्ये मुलीला शोधले. मात्र, ती काही सापडली नाही.

Alibaugh
Beed Shocking:'मी फक्त तुझ्यासाठी घरी येतो, माझ्या मांडीवर बस'; बीडच्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याचं मुलीसोबत अश्लील कृत्य

पालकांनी शेवटी स्विमिंग पूल जवळ जाऊन पाहिले तर, चिमुकली स्विमिंग पूलमध्ये बुडालेली आढळून आली. स्थानिकांच्या मदतीने चिमुकलीचा मृतदेह स्विमिंग पूलच्या पाण्यातून बाहेर काढला. तसेच तातडीने तिला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला. डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Alibaugh
ब्रेकअप करताच एक्स गर्लफ्रेंडचे प्रायव्हेट VIDEO व्हायरल, पैशांची मागणी अन् ब्लॅकमेलिंग; शेवटी तरूणीनं..| Crime News

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com