Mumbai Agra Highway : मुंबई- आग्रा महामार्गावरची वाहतूक तासाभरापासून ठप्प; क्रेन पडली रस्त्याच्या मधोमध

या घटनेचे छायाचित्र काढण्यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केली हाेती.
Mumbai Agra Highway
Mumbai Agra Highwaysaam tv
Published On: 

- अजय साेनवणे

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावर (mumbai agra national highway) गेल्या तासभरापासून वाहतुक ठप्प झाली आहे. दुपारच्या सुमारास वाहतुक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्यांची वाहन उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी रस्त्याच्याकडेला झाडं पाहून लावत आहेत. (Breaking Marathi News)

Mumbai Agra Highway
Maharashtra : राज्यातील पुरवठा विभागाचे कर्मचारीही निघाले संपावर; जाणून घ्या कारण

आज पहाटेच्या सुमारास नाशिकच्या (nashik) चांदवड (chandwad) जवळील राहुड घाटात (rahud ghat) कांद्याच्या (onion) गोण्या घेऊन जाणारा ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावर पलटी झाला. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर सर्वत्र कांद्याच्या गोण्या पसरल्या होत्या. परिणामी या महामार्गावरील वाहतुक खाेळंबली हाेती.

या कांद्याची गाेण्या हटविल्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली. त्यानंतर रस्त्यावरुन ट्रक बाजूला घेण्यासाठी क्रेन बाेलावली गेली. ही क्रेन दुपारच्या सुमारास आली. क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरु करण्यात आले हाेते.

Mumbai Agra Highway
MCA : राज्यातील क्रिकेटपटूंसाठी 'एमसीए' चे अध्यक्ष Rohit Pawar यांनी दिली आनंदाची बातमी, म्हणाले...

दरम्यान ज्या क्रेनच्या साहयाने ट्रक बाजूला करण्यात येत हाेता. ती क्रेन तुटल्याने रस्त्याच्या मधाेमध पडली. त्यामुळे पुन्हा मुंबई-आग्रा महामार्ग ची वाहतूक ठप्प झाली. गेल्या तासभरापासून ही वाहतुक ठप्प झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.