ST Employees Strike Withdrawal: आज सकाळी सर्व 251 आगारातील वाहतूक नियमितपणे सुरू झाली आहे. ज्यादा वाहतुकीसाठी मुंबईत येणाऱ्या बसेस त्या त्या आगारातून निघालेल्या आहेत. आज आणि उद्या होणाऱ्या ज्यादा वाहतुक कोणतेही विघ्न न येता सुरळीत पार पडावे, अशीच सर्वांना आशा आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 310 विशेष गाड्या धावत आहेत. मुंबई, सुरत , अहमदाबाद, वांद्रे , पनवेल वरुन विशेष गाड्या सुटणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवळपास 150 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी अधिकारी तैणात करण्यात आलेत. प्रवाशांच्या सोयीसाठी यात्री सहाय्यक तैनात करण्यात येणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या चाकरमान्याना प्रचंड त्रास सहन करीत आहेत. रात्री मुंबईतून निघालेल्या चाकरमान्यांना ८ तास झाले तरी अर्धे अंतर देखील पार करता आले नाही. मागील २ तासांपासून हे चाकर मानी लोणेरे ते माणगाव दरम्यान अडकून पडले आहेत. तर कोलाड, नागोठणे, सुकेळी खिंड, इंदापूर, इथ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर सुळेळी खिंडीत अपघात झालाय. दोन ST बसची समोरासमोर धडक लागल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर काहीकाळ वाहतुक ठप्प झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आता, वाहतुक सरळीत झाली आहे. दोन्ही वाहनांच नुकसान झालेय. सुदैवाने कोणीही जखमी नाही.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या मध्यभागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते १८ सप्टेंबर दरम्यान शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या काळात शहरात मध्य भागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
या वाहतूक बदलांची काटेकोर पद्धतीने पालन करण्यात यावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी केले आहे.
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मंडळाकडून गणपती बाप्पांना मंडपात आणण्याची लगबग दिसून येत आहे. नंदुरबार शहरातील संत कबीरदास व्यायाम शाळेने आपला गणपती वाजत गाजत आणला, लाइटिंग लेजर शो करत गणरायाच्या आगमन करण्यात आला आहे. नंदुरबार शहरात छोटे-मोठे मिळून जवळपास ५०० मंडळ आहेत. या मंडळाकडून गणरायाला मोठ्या उत्साहात आणि वाजत गाजत आणलेय.
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या बिनबा गेट परिसरात एका घरी बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली. शहरात बिबट्या घुसण्याची पहिली वेळ आहे. रात्रीच्या सुमारास हा बिबट्या शहरात आला आणि दादा बोकडे यांच्या घरात घुसला. सकाळी सात वाजताच्या सुमारास तो काही युवकांना दिसला. याचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. वन पथकाने लगेच येऊन त्याला पकडण्याची तयारी केली. रस्त्यावरील घर असल्याने दुतर्फा लोकांची गर्दी झाली.
अमरावतीच्या जवाहरनगरात सराफा व्यापाऱ्यास लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. 25 किलो चांदी लुटली आहे. 8 अज्ञात आरोपींनी मारहाण करत देशी कट्टा दाखवून लुबाडल्याची घटना घडली आहे. सुवर्णकार पिता पुत्राला लुबाडणूक मारहाण करत चोरटे घटनास्थळ वरून पसार झाले.
झटापटी दरम्यान सुवर्णकाराने सोने व रोख रक्कमची बॅग परिसरात फेकल्याने सोने व रोक रक्कम बचावली. गाडगेनगर पोलिसांकडून अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल झाले आहेत. अरविंद जावरे व उत्तमराव जावरे असे सुवर्णकार पिता पुत्राचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यात सोयाबीन हरभऱ्याच्या दरात पहिल्यांदाच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगाम पूर्व दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या दिवसात सातत्याने सर्व धान्यांमध्ये दरवाढ होत असली तरी मात्र सोयाबीनला वर्षभरात हमीभाव देखील मिळाला नाही. वर्षभर 4 हजार रुपये प्रतिक्विंटलवर सोयाबीनचे दर स्थिरावले होते. मात्र आता महिन्याभरात सोयाबीनच्या हंगाम सुरू होत असताना सोयाबीनला 4 हजार 600 रुपयांवर दर मिळाला आहे. सोबतच पाच ते साडेपाच हजार रुपयावर स्थिरावलेल्या हरभऱ्यालाही पहिल्यांदाच 7 हजार500 रुपयापर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..
कॅब चालक-मालकांची प्रशासनाबरोबर झालेली बैठकीत ठोस निर्णय झाली आहे. बैठक निष्फळ ठरली. कॅब चालक मालक आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅब विषयी रेट कार्ड जाहीर झाले आहे. सात ते आठ महिने उलटून गेली तरीही या दरपत्रकानुसार ओला, उबर व तत्सम अॅप्लीकेशनवर आधारित कंपन्यांनी दर अंमलात आणले नाहीत. याचे पालन न करणाऱ्या प्रवासी कॅब कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कॅब चालक मालक आज मुंबईत मंत्रालयाकडे निघाले असताना पोलीस प्रशासनाने हा ताफा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर अडवला. मंत्रालयातील प्रधान सचिवांनी या कॅब चालकांच्या काही प्रमुखांना मुंबईत मंत्रायल येथे बोलवले. परंतु प्रधान सचिवांबरोबर झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे मंत्रालयातुन कॅब चालकांच्या प्रमुख वर्षा शिंदे परतल्यानंतर आंदोलन कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकात एका युवतीने भरधाव रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ही घटना 26 ऑगस्ट रोजीची असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेतील युवती ही विवाहित असून तिचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण-तणावामुळे या युवतीने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. घटनेचा व्हिडिओ मानवी मन सुन्न करणारा ठरत आहे..
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या जिर्णोद्धाराच्या विविध कामांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्याचं ठरवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री यांना यासाठी आणण्याचा प्रयत्न असून त्यांच्या हस्ते भुमीपुजन करण्याचा माणस आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या व परिसराच्या जिर्णोद्धाराच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले असून त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. तब्बल 58 कोटी रुपयांची ही कामे केली जाणार आहेत. मंदिराचे विकास कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून तब्बल सहा टप्प्यात ही कामे होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या थकबाकी धारकांना मनपाकडून जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकाकडून कर वसुलीचा धडाका सुरू करण्यात आलाय. मागील पाच महिन्यात 73 कोटी 71 लाखांची वसुलीची महापालिकेने केली आहे.
महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये तिजोरीत आले पाहिजे या दृष्टीने आता नियोजन केलं आहे. त्यामुळे 1 एप्रिल पासून मालमत्ता कर पाणीपट्टी आणि थकबाकी वर पालिका प्रशासनाने भर दिलाय त्याबरोबरच मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना आता जप्तीच्या नोटिसा देण्यास सुरुवातही केली आहे.
नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सूचना दिल्या आहेत.
मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी निर्णय घेण्यात आलाय. मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे.
अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अमरावतीत शिक्षक दिनी आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांचं काळ्या फिती लावून आंदोलन सुरु आहे. आदिवासी आश्रम शाळेची वेळ 11 ते 5 करावी,अनुदानित आश्रम शाळेला इमारतीसाठी अनुदान देण्यात यावे, आश्रम शाळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुविधा करून द्यावी ह्या विविध मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन पुकारलेय.
भिवंडी ग्रामीण परिसरात मानकोली परिसरात नारपोली पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेत घेतले आहे. त्या व्यक्तीकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. शिशपाल रज्जु जाटव,वय १९ वर्षे रा. करौली,राजस्थान असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता त्यास सहा सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळणार आहे. येथील वाघाळे गावात एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प आणि कमिन्स कंपनी व अफार्म यांच्या माध्यमातून आदिवासी गावाचा कायापालट केला जात आहे. गावातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच संगणकाचे शिक्षण मिळावे म्हणून सामाजिक दायित्व निधीतून गावातील जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक अशी संगणक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.