पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर आज सर्वच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बुधवारी दिल्ली पोलिसांनी कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला असून पुजाचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं सांगितलं आहे. २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेत सादर केलेली प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांद्वारे तयार केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तर UPSC ने केलेल्या आरोपात तथ्य नसून पूजाने ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तस रिजॉइंडर देखील तिने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलं आहे. आज कोर्ट पूजाचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावत की तिचा जामीन मंजूर करून तिला दिलासा देत हे पाहणं महत्वाचं आहे.
राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप संस्थगित करण्याची घोषणा केली.
लाडकी बहीण योजनेला ४५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने इतर योजनांसाठीच्या व खात्यांतील निधीत कपात सुरू केली आहे. याचा फटका 'आनंदाचा शिधा' प्रमाणेच आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनाही बसू लागला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी (३ सप्टेंबर) एक परिपत्रक काढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केली.
टेलिफोन एक्स्चेंज सेंटरसाठी ऑनलाइन ग्राहक मिळवल्याचं स्पष्ट झालेय. पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाकडून तिघांना अटक करण्यात आली. चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे फोन लोकल नंबरवर पाठवत कोंढवा येथील बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होते.
भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले हे सेंटर तिघेजण चालवत होते. त्यातील दोन आरोपी आठवी पास तर एक उच्चशिक्षित आहे. तिघांनाही सेंटर कसे चालवायचे हे माहिती होते व त्यांनी ऑनलाइन ग्राहक मिळविले होते, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस) केलेल्या तपासातून पुढे आली आहे. या गुन्ह्यात एटीएसने नौशाद अहमद सिद्धिकी ऊर्फ कुमार (वय ३२ रा. कोंढवा ) आणि महम्मद उजैर शौकत अली अन्सारी ऊर्फ सोनू (वय २९ भिवंडी) या दोघांना मंगळवारी (ता. ३ ) तर पियुष सुभाषराव गजभिये (वय २९ रा. वर्धा) याला बुधवारी (ता. ४) सकाळी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना बुधवारी वानवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी प्रशकीय यंत्रणेकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते किट वाटप होणार आहे. वर्ध्यात स्वलांबी शाळेच्या मैदानावर सभेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
माढ्यात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात अजित पवार गट अडचणीत आला आहे. आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो शिंदे समर्थकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. सुरज देशमुख माढा विधानसभेसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
पुणे : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया तिसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. आतापर्यंत ७३ हजार ७२० प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप ३१ हजार ५१८ जागा रिक्त आहेत.
यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २३८ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून १ लाख १६ हजार ९३२ प्रवेश झाले. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ बालकांचा समावेश होता.
कोकणात जाणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वहतूक कोंडी झाली आहे. सहा ते सात किमीच्या रांगा लागल्या आहेत. माणगाव, तळेगाव, लोणेरे दरम्यान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले गणेशभक्त वाहतुक कोंडीत आडकले आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने वहातुक कोंडी होत आहे. माणगाव बाजार पेठ, तळेगाव येथील उड्डाण पुल आणि लोणेरे विद्यापीठ जोडरस्ता परिसरात वहानांच्या रांगा लागल्या आहेत.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका मराठवाड्यातील ३ हजार ६७५ गावांतील जवळपास १५ लाख ६१ हजार ७१ शेतकऱ्यांना बसला आहे. यात सर्वाधिक ९५ टक्के जिरायत क्षेत्रफळ आहे. १२ लाख ४१ हजार ९६७ हेक्टरवरील पिके सध्या पाण्यात आहेत. लहान-मोठी मिळून ६०९ जनावरे दगावली आहेत. तर १२ जणांचा मृत्यू वीज पडून, पुरात वाहून झाला आहे. १ हजार २२२ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. तर ११५ पक्की घरे पावसामुळे बाधित झाली आहेत. १३२ जनावरांचे गोठे पावसामुळे वाहून गेले आहेत. मराठवाड्यात १ सप्टेंबरपासून झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे १ लाख हेक्टरवर नुकसान झाले. शेतीसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया विभागीय महसूल व कृषी यंत्रणेने हाती घेतली आहे.
कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. CBI ने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले आहे. 23 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने CBI ला शपथपत्र सादर करायला सांगितल होतं. कोर्टाने केजरीवाल यांना उत्तर दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. मनीष सिसोदिया, के कविता यांना या प्रकरणी जामीन मिळाला असल्याने आणि याच प्रकरणात केजरीवाल यांना ED ने जामीन मंजूर केला असल्याने आज CBI प्रकरणात दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.