Today Gold Rate: सुवर्णनगरीत सोनं १ लाखांच्या उंबरठ्यावर, एका दिवसांत २,६०० रुपयांची वाढ

Today Gold Rate In Jalgaon: सोन्याचे दर खूप वाढले आहेत. सोन्याचे दर आता १ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.
Today's Gold Rate
Today's Gold Ratesaam tv
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात वाढ होत आहे तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता सोने एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. (Gold Rate Today)

Today's Gold Rate
Government Scheme: लेकीच्या लग्नाची चिंता मिटली! सरकार देतंय १ लाखांची मदत; योजना नक्की आहे तरी काय?

सोन्याचे दर

जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात जरी वाढ होत असली तरी एकाच दिवसात २६०० रुपयांनी वाढ झाली आहे.त्यामुळे सोने ९९८०० रुपयांवर येऊन पोहचले आहेत. सोन्याचे भाव उच्चांकीवर पोहचले आहेत.

सोन्याच्या भावात वाढ झाली असली तर सोन्याच्या दरात मात्र घसरण होत आहे. चांदीचे भाव एक लाख सहा हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.

१२ जून रोजी सोन्याच्या भाव ७०० रुपयांच्या वाढीसह ९७२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. १३ जून रोजी सकाळी हे भाव थेट २००० रुपयांनी वाढले. संध्याकाळी ते ६०० रुपयांनी वाढले.त्यानंतर सोन्याचे भाव वाढतच आहेत. यापूर्वी २२ एप्रिल रोजी सोने ९९००० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर भाव कमी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून हे भाव ९६००० ते ९७००० दरम्यान होते. परंतु आता हे भाव एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

Today's Gold Rate
Today Gold Rate: खुशखबर! वटपोर्मिमेला सोन्याचे दर घसरले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा भाव किती?

सोन्याची गुंतवणूक फायद्याची

सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. त्यात सोन्याचे भाव कधीही १ लाखांपेक्षा जास्त होऊ शकतात. जर सोन्याचे दर वाढले तर ग्राहक सोने खरेदीकडे पाठ फिरवतील. आताच सोने खरेदीचे दर कमी झाले आहेत. परंतु सोने ही एक गुंतवणूक आहे. तुम्हाला भविष्यात सोने खरेदी करुन फायदाच होणार आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळेच तुम्ही सोन्याचे भाव उतरल्यावर तुम्ही खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला फायदा होईल.

Today's Gold Rate
Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; 24K गोल्ड 21,200 रूपयांनी वाढलं, पाहा तुमच्या शहरातील दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com