
आज वटपोर्णिमा आहे. वटपोर्णिमेच्या दिवशी अनेकजण आपल्या बायकोला काहीतरी सोन्याचा दागिना बनवतात. जर तुम्हीही आज सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सोन्याचे दर आज घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी आजचा दिवस चांगला असल्याचे म्हणायला हरकत नाही.
सोन्याच्या दरात अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. आज आठवड्याच्या दुसरी दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळ्यामागे ११० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)
आज २४ कॅरेट सोने प्रति तोळा ९७,५८० रुपयांवर विकले जात आहे. या दरात ११० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,०६४ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचे भाव ९,७५८ रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)
आज २२ कॅरेट सोने प्रति तोळा ८९,४५० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ७१,५६० रुपये आहे. १ तोळा सोन्याचे दर ८,९४५ रुपये आहे. प्रति तोळ्यामागे १०० रुपयांनी घसरण झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेटच्याही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण फार जास्त झालेली नाही. आज १० ग्रॅम सोन्याचे दर ७३,१९० रुपये आहे. या दरात ८० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,५५२ रुपये आहेत.
चांदीचे दर
आज चांदीच्या दरात फार बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८६४.८० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीचे दर १,०८१ रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.