Tipu Sultan Controversy: टिपू सुलतानवरून शाब्दिक युद्ध पेटलं; CM फडणवीसांनी सपकाळांना ठणकावलं

Fadnavis Slams Harshvardhan Sapkal: टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या विधानानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सफकाळ यांना ठणकावलंय.
Fadnavis Slams Harshvardhan Sapkal
Chief Minister Devendra Fadnavis reacts strongly after Congress leader Harshvardhan Sapkal comments on Tipu Sultan comparison row.saam tv
Published On
Summary
  • टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यात राजकीय वाद पेटला

  • हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे वाद तीव्र

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला

टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यातील राजकराणातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय. टिपू सुलतानला शिवरायाच्या समकक्ष पाहायला पाहिजे, असं म्हणणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच सुनावले आहे. मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता.

Fadnavis Slams Harshvardhan Sapkal
Maharashtra Politics: मोठी बातमी! तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे? मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय, वाचा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. तर दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा, अशी काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Fadnavis Slams Harshvardhan Sapkal
Rahul Narwekar Video: वाद जमीन मोजणीचा का दोन शेतकऱ्यांचा? व्हायरल व्हिडिओवर नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. तर दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा, अशी काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे- सपकाळ

"छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे. त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे," असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com