Shiv Sena "सावध राहा साहेब, तुमच्या मुलाची सुपारी दिलीय"; शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाच्या जीवाला धोका

Sanjay Gaikwad's Family Threatened by Unknown Person: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना धमकीचे पत्र; मुलाच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा. राजकीय वर्तुळात खळबळ
SHINDE MLA
SHINDE MLASaam
Published On

राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले असून, या पत्रातून त्यांच्या धाकट्या मुलाच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड यांच्या मुलाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली असून, त्या संदर्भात एक मिटींग पार पडली असल्याचा दावा, या पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र अज्ञात व्यक्तीने पाठवले असून, या पत्रामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय लिहलंय त्या पत्रात?

शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा धाकटा मुलाच्या म्हणजेच मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका असल्याचे खळबळजनक पत्र समोर आले आहे. गायकवाड यांनाच पत्र पाठवून सावध करण्यात आले आहे.

अज्ञात पाठवलेल्या पत्रात लिहिले की, "तुमचे जुने सहकारी समाधान मोरे आणि त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्याकडून मृत्यूंजय गायकवाड याला जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. या कामासाठी ते सक्रिय झाले आहेत. यासाठी मिटिंगही पार पडली. तुमच्या कुटुंबाला धोका आहे. सतर्क राहा", असं पत्रातून गायकवाड यांना सावध आणि त्यांच्या धाकट्या मुलाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

SHINDE MLA
Mahad: हद्दच झाली! दबक्या पावलाने यायचा, महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, मोडक्या खोलीत जायचा; अन्...; व्हिडिओ व्हायरल

याशिवाय पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देऊन मजकूर खरा असल्याची हमी देण्यात आली आहे. तसेच "माझा काहीही वैयक्तिक हेतू नाही, मी तुमचा शुभचिंतक आहे", असंही त्या व्यक्तीने शेवटी नमूद केलं आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

SHINDE MLA
Kalyan: वृद्ध महिला घरात एकटीच, पाण्याच्या बहाण्याने आत गेला, तोंड दाबून जमीनीवर आपटलं आणि..

आधीही दोनवेळा देण्यात आली होती धमकी

संजय गायकवाड यांना यापूर्वीही दोन वेळा अशा प्रकारची धमकीची पत्रे मिळालेली आहेत. त्यामुळे हे तिसरे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस यंत्रणेकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी गायकवाड लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com