Mahad: हद्दच झाली! दबक्या पावलाने यायचा, महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, मोडक्या खोलीत जायचा; अन्...; व्हिडिओ व्हायरल

CCTV Footage Reveals Pervert Stealing Womens Undergarments : महाड शहरात एका चोरट्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. हा चोरटा दागिने किंवा पैसे चोरत नसून महिलांचे अंतर्वस्त्र चोरी करत आहे.
mahad
mahadSaam
Published On

महिलांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना महाड शहरात एक किळसवाणा प्रकार घडला आहे. महिलांचे वाळत घातलेले वापरलेले अंतर्वस्त्र चोरी करणाऱ्या एका विकृत व्यक्तीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

महाड शहरात एका चोरट्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. हा चोरटा दागिने किंवा पैसे चोरत नसून महिलांचे अंतर्वस्त्र चोरी करत आहे. महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेऊन चोर पसार होत आहे. निलेश ऐनकर (वय वर्ष ३८) असे आरोपीचे नाव आहे. हे किळसवाणे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

mahad
Pune Hospital: "शरमेनं मान खाली.. यापुढे इमर्जन्सी रूग्णांकडून डिपॉझिट.."; दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने बाजू मांडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकृत आरोपी परिसरात फिरून दोरीवर वाळत घातलेले महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि क्षणात पसार व्हायचा. हे अंतर्वस्त्र त्याने बंद मोडक्या घरात लपवून ठेवल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र गायब व्हायचे. दरम्यान, एका सीसीटीव्हीत विकृत व्यक्तीची चोरी करत असतानाचे कृत्य कैद झाली.

mahad
Rashtrawadi: कृषीमंत्र्यांना शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावलं; "कृषीमंत्री सत्तेच्या मस्तीत.." वडेट्टीवारही कडाडले

यावरून ही माहिती उघड झाली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com