
अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याणजवळील अटाळी परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय रंजना पाटेकर यांचे दागिने चोरून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अखेर खडकपाडा पोलिसांच्या चिकाटीच्या तपासामुळे या प्रकरणातील आरोपीचा छडा लागला. चांद उर्फ मोहम्मद शेख याला पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण जवळील अटाळी परिसरात साठ वर्षीय रंजना पाटेकर यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. रंजना यांचे दागिने चोरून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला . डीसीपी अतुल झेंडे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले.
रंजना यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं. मात्र, तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. यादरम्यान याच परिसरात राहणारा चाँद शेख याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी चाँदचा तपास सुरू केला असता, चाँदला कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेप सूनवण्यात आली होती. त्यावेळी चाँद सिलेंडर डिलिव्हरीचं काम करत होता.
याच दरम्यान चिंचपाडा परिसरात एका महिलेशी त्याचा वाद झाला होता. या वादातून चांदने या महिलेच्या डोक्यात सिलेंडर घातला होता. त्यात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात चाँदला जन्मठेप सुनावण्यात आली होती. जेलमधून सुटून आल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह अटाळी परिसरात राहत होता. पोलिसांना चाँदवर संशय बळवल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतलं.
गुन्ह्याची कबुली आणि..
चाँदने गुन्ह्याची कबुली दिली. चाँद मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे पाहिजे होते. त्यासाठी त्याने चोरीचा प्लॅन आखला. आजूबाजूच्या घरांचे रेकी करणं सुरू केलं .यावेळी रंजना पाटकर या घरात एकट्याच राहत असल्याचे त्याच्या लक्षात आले. रंजना पाटकर या घरात एकट्याच असताना चाँद त्यांच्या घरी गेला, त्यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितलं.
रंजना पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेल्या असता चांदणे घरात प्रवेश करत आधी हॉलमधील टीव्हीचा आवाज वाढवला. त्यानंतर त्यांचं तोंड दाबून जमिनीवर आपटून, गळा दाबून रंजना यांची हत्या केली. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र व कर्णफुले असा तब्बल एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून चाँद तेथून पसार झाला होता. अखेर खडकपाडा पोलिसांनी चाँदला बेड्या ठोकल्या आहेत.
निष्पाप तरूणाला तुरूंवास
दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांनी रंजना पाटेकर यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपक सपकाळ या तरुणाला ताब्यात घेत अटक केली होती . त्याला न्यायालतात हजर करण्यात आले असता त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. मात्र, चाँद याच्या अटकेनंतर दिपकचा या हत्येच्या घटनेशी काही संबध नसल्याचे समोर आले. त्यामुळे दिपकची मात्र या गुन्ह्यात फरफट झाली.
मयत पाटील यांच्याशी दीपकचा वाद झाला होता. त्यामुळे मयत पाटील यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने तपासादरम्यान दीपकला अटक करण्यात आली होती. दिपकची सुटका करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.