Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

Legislative council election: विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयांनंतर संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले. भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा करत त्यांनी पैशांचा वापर, सत्तासंघर्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
Sanjay raut
Sanjay rautsaam tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्ष, पैशांचा वापर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक गंभीर आरोप केले.

फडणवीस यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू खोटं

संजय राऊत म्हणाले की, शिंदे गट आणि भाजप यांच्यात नेमकं नातं काय आहे, हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू खरं नसून त्यामागे वेगळीच राजकीय परिस्थिती आहे, असा दावा त्यांनी केला. शिंदे गट बाजूला असताना भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे सर्वांना दिसत असल्याचंही ते म्हणालेत.

Sanjay raut
Operation Tiger: ४ वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर; वाचा'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी

त्यांच्या मते, एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून सतत बळ दिलं जात आहे आणि हे राज्याच्या नेतृत्वासाठी योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही ही गोष्ट चांगलीच माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान भाजपमध्ये कोणताही कोल्ड वॉर नसून थेट ओपन वॉर सुरू असल्याचं राऊत म्हणाले. राज्यात शिंदे यांचा वापर फडणवीसांविरोधात केला जातोय. याचाच भाग म्हणून शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपने पाडला असून, त्यालाही राजकीय बंडाचाच प्रकार म्हणता येईल, असा टोला त्यांनी लगावलाय.

राज्यात सध्या जे काही राजकारण सुरू आहे, ते भाजपच्या अंतर्गत सत्तासंघर्षाचाच भाग असल्याचा आरोप राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.

निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर

निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचाही आरोप त्यांनी केला. सत्तेचा आणि पैशाचा प्रभाव वापरून निकालांवर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न झाला, असं ते म्हणाले. दरम्यान शिवसेना फोडण्यामागचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला कमकुवत करणं हा होता, असा आरोप करत राऊत म्हणाले की, राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यासाठी हा संपूर्ण डाव रचला गेला. मात्र आमदार आणि खासदार फोडता येतील, पण शिवसैनिकांची जिद्द आणि लढण्याची ताकद संपवता येणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

गोकुळ गीते यांच्या विजयाबाबत बोलताना त्यांनी भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना मतदान केल्याचा दावा केला. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याचं ते म्हणाले. गद्दारीमागे एकच हेतू असल्याचा आरोप करत त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं. काही लोकांना सत्तेची आणि पैशाची मस्ती चढली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Sanjay raut
ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना राऊत यांनी त्यांना अमित शहा यांचे ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ असल्याची टीका केली. तसेच भाजप हा विचारांपेक्षा व्यापार करणारा पक्ष बनला असल्याचंही ते म्हणाले. मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने मराठवाड्यासाठी नेमकं काय केलं, याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Sanjay raut
Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ते नामचिन गद्दार आहेत आणि गद्दारांना कोणतीही ठाम भूमिका नसते. त्यांच्या मनधरणीसाठी आम्ही कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com