राज्यात पावसाचा धोका कायम; पुढील काही तास मुसळधार पावसाचे

राज्यात पुढचे २,३ दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे, मुंबई वेधशाळेनें दिली माहीती
राज्यात पावसाचा धोका कायम; पुढील काही तास मुसळधार पावसाचे
राज्यात पावसाचा धोका कायम; पुढील काही तास मुसळधार पावसाचेSaam Tv
Published On

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहीतीनुसार राज्यात पुढचे २, ३ दिवस, अजूनही शक्यतो कोकण व मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.The meteorological department has forecast heavy rains in Maharashtra

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहीतीनुसार राज्यात पुढचे २, ३ दिवस, अजूनही शक्यतो कोकण व मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणाक असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुढील आढवड्यापासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे ही माहीती देणारं ट्विट हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकरांनी केलं आहे.

हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं आज ट्विटद्वारे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा व कोल्हापूरला धोक्याचा म्हणजेच Red Alert दिला आहे. तसेच मुंबई, पालघर आणि ठाणे, यतवमाळ आणि चंद्रपूरला Orange Alert दिला आहे. विदर्भातील उर्वरित सर्व जिल्हे, आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार वगळता सर्व जिल्ह्यांना Yellow Alert देण्यात आला आहे.

पुढील आठवड्यापासून पावसाला विश्रांती

हवानाम विभागाच्या माहीतीनूसार पुढील आठवड्यापासून म्हणजेच सोमवार पासून पाऊस काही प्रमामात कमी होण्याची चिन्ह असल्याचही या खात्याने सांगितलं आहे.(Rest the rain from next week)

पुढील काही तासांसाठी कोसळधार इशारा..

कालपासून राज्यामध्ये पावसाचे तांडव सुरु आहे पावसामुळे आज जवळपास 80 लोकांचे प्राणसुध्दा गेले आहेत, महाड दुर्घटना सातारा पाटन अशा विविध ठीकाणी दरड कोसळल्याने लोकांचे प्राण गेले आहेत. अजूनही पावसाच्या पाण्यामुळे तेथील मदत कार्याला अडथळा येत असतानाच आता हवामान खात्याने अजून काही तास मुसळधार पावसाचा(Heavy Rainfall) इशारा दिल्याने नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.

राज्यात पावसाचा धोका कायम; पुढील काही तास मुसळधार पावसाचे
रायगडात मृत्यूचं तांडव! तळीयेत 38 तर पोलादपूरात 9 मृत्यू

पाटण मधील रस्ते पाण्याखाली

पाटण(Patan) मध्ये दरड कोसळल्याची घटना समजताच मदतकार्यासाठी (Help) मदत पथके तिकडे रवाना झाली आहेत मात्र काही ठीकाणचे सर्व रस्तेच पाण्याखाली गेल्याने तिथे मदत पथकांना जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे परिणामी काही ठीकाणी जाणंही शक्य नाही आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com